केंद्र सरकारकडून ‘या’ महिन्यापर्यंत कांदा निर्यातीवर बंदी, शेतकरी आक्रमक, लिलाव पाडले बंद
Onion Export: केंद्राने स्थानिक बाजारपेठेत कांद्याचे भाव (Onion prices) नियंत्रणात आणण्यासाठी पुन्हा एकदा निर्यातबंदीचे हत्यार उपसले आहे. ही बंदी पुढील वर्षी मार्चपर्यंत लागू राहणार आहे. परकीय व्यापार महासंचालनालयाने आज यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. केंद्राच्या या निर्णयाची माहिती मिळताच राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी लिलाव थांबले आहेत. महामार्ग रोखल गेले. केंद्राच्या निर्णयामुळे कांद्याचे भाव 500 ते 1000 हजार रुपयांनी घसरले आहेत.
आयटीआय आणि इंजिनिअर्संना नोकरीची संधी, RITES मध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू
यापूर्वी, केंद्राने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ऑक्टोबरमध्ये किरकोळ बाजारात 25 रुपये प्रति किलो या सवलतीच्या दराने बफर स्टॉकमधील कांदा विक्रीसाठी आणला होता. आता स्थानिक बाजारपेठेतील कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. 31 मार्च 2024 पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी असेल असे परिपत्रक सरकारने जारी केले आहे. याचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयानंतर शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत अनेक ठिकाणी आंदोलन सुरू केले आहे.
दोन वर्षात 260 कोटी लोकांचा पर्सनल डेटा लीक, अॅपलचा धक्कादायक अहवाल
लिलाव बंद पाडले
लासलगाव, पिंपळगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद पाडण्यात आले. कांदा उत्पादक शेतकरी आणि कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांमध्ये केंद्र सरकारविरोधात संतापाची लाट उसळली आहे. नाशिकच्या चांदवडमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. चांदवड बाजार समितीत कांदा शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. पिंपळगाव, लासलगाव, उमराणा, मुंगसरा यासह नाशिकच्या ७५ टक्के बाजारपेठा बंद आहेत.
किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न
किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने यापूर्वीच अनेक पावले उचलली आहेत. ऑगस्टमध्ये भारताने ३१ डिसेंबरपर्यंत कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावले होते. दरम्यान, परकीय व्यापार विभागाने सांगितले की, इतर देशांनी केलेल्या विनंतीचा विचार करून स्वतंत्र कांदा निर्यातीला परवानगी दिली जाईल. ही अधिसुचना जारी होण्यापूर्वी ज्या कांद्याचे निर्यातीसाठी लोडिंग सुरू झाले होते, त्या कांद्याच्या शिपमेंटला निर्यात करण्याची परवानगी देण्यात आली.
देशातून ९.७५ लाख टन कांद्याची निर्यात
या आर्थिक वर्षात १ एप्रिल ते ४ ऑगस्ट दरम्यान देशातून ९.७५ लाख टन कांद्याची निर्यात झाली आहे. बांगलादेश, मलेशिया आणि यूएई हे भारतातून कांदा आयात करणारे तीन प्रमुख देश आहेत.