आयटीआय आणि इंजिनिअर्संना नोकरीची संधी, RITES मध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू
RITES Recruitment 2023: आज पात्रता असूनही अनेकांच्या हाताला रोजगार नाही. त्यामुळं प्रत्येकजण नोकरीच्या शोधात आहे. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. Rail India Technical and Economic Service Limited (RITES) अंतर्गत शिकाऊ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 डिसेंबर 2023 आहे. Rail India Technical and Financial Services Recruitment 2024 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण यायाबद्दल तपशीलवार माहिती नोटिफिकेशनध्ये दिली आहे.
‘अॅनिमल’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! पहिल्या आठवड्यात जमवला 536.3 कोटींचा गल्ला
एकूण रिक्त पदे- 257
पदाचे नाव आणि रिक्त जागा –
पदवीधर अप्रेंटिस – 160
डिप्लोमा अप्रेंटिस – 28
ट्रेड अप्रेंटिस (ITI) – 69
शैक्षणिक पात्रता –
पदवीधर प्रशिक्षणार्थी: 60% गुणांसह सिव्हिल/इलेक्ट्रिकल/सिग्नल आणि टेलिकॉम/मेकॅनिकल/केमिकल/मेटलर्जी मधील अभियांत्रिकी पदवी किंवा बी.ए. / बीबीए / बी.कॉम.
डिप्लोमा अप्रेंटिस: सिव्हिल/इलेक्ट्रिकल/सिग्नल आणि टेलिकॉम/मेकॅनिकल/केमिकल/मेटलर्जी मधील अभियांत्रिकीमध्ये 60% गुणांसह डिप्लोमा.
ट्रेड अप्रेंटिस: 60% गुणांसह सिव्हिल/इलेक्ट्रीशियन/मेकॅनिक/वेल्डर/फिटर/टर्नर/प्लंबर/सीएडी ऑपरेटर/ड्राफ्ट्समनमध्ये ITI
Tiger Shroff: ‘टायगर इफेक्ट’ अभिनेता टायगर श्रॉफ ठरतोय अनेक ब्रँडचा चेहरा
अर्ज शुल्क – कोणतेही शुल्क नाही.
अधिकृत संकेतस्थळ –
https://rites.com/
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख– 1 डिसेंबर 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 डिसेंबर 2023
जाहिरात
https://drive.google.com/file/d/1IlTVSwzJQJSdcrQ0zay7mQy4LT4ua0mt/view
अर्ज कसा करावा-
उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. अर्ज केवळ अधिकृत वेबसाइटद्वारेच स्वीकारले जातील, इतर कोणत्याही माध्यमातून सबमिट केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. भरतीसाठी अर्ज सादर करताना, उमेदवारांनी त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक प्रविष्ट करावी, फॉर्ममध्ये कोणतीही चुकीची माहिती असू नये, अन्यथा उमेदवार अपात्र ठरू शकतो. अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे देखील जोडणे आवश्यक आहे, उमेदवारांना ही कागदपत्रे अपलोड करावी लागतील. जर कागदपत्रे योग्य साईजमध्ये असतील तरच अपलोड होतील. फॉर्म भरल्यानंतर, शेवटी सबमिट करण्यापूर्वी अर्ज पुन्हा एकदा तपासावा आणि नंतरच सबमिट करावा.