दोन वर्षात 260 कोटी लोकांचा पर्सनल डेटा लीक, अॅपलचा धक्कादायक अहवाल

  • Written By: Published:
दोन वर्षात 260 कोटी लोकांचा पर्सनल डेटा लीक, अॅपलचा धक्कादायक अहवाल

Personal Data Leak : काही दिवसांपूर्वी भारतीयांचे आधार कार्ड आणि पासपोर्टची माहिती चोरीला गेल्याची माहिती समोर आली होती. शिवाय, आजचा युग हे डिजीटलचं युग असून अनेकदा डेटा लीक झाल्याच्या घटना घडल्या. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डीपफेक, हॅकिंग आणि माहिती सुरक्षा अशा विविध पैलूंवर चर्चा सुरू असतानाच अॅपलने (Apple) एक अहवाल उघड करून धक्कादायक माहिती दिली. त्या अहवालानुसार, गेल्या दोन वर्षांत जगभरातील 260 कोटी नागरिकांची वैयक्तिक माहिती लीक (Personal information leaked) झाली आहे.

‘अजित पवार गटाचा चाचणीपासून पळ काढण्याचा प्रयत्न’; शरद पवार गटाचा आरोप 

मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक डॉ.स्टुअर्ट मॅडनिक यांनी हे संशोधन करून अहवाल प्रकाशित केला आहे. 2013 ते 2022 या दशकात डेटा सुरक्षा नियमांचे उल्लंघन होण्याचे प्रमाण वाढले आहे. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे हॅकिंग आणि डेटा चोरीच्या घटनांमध्ये तिपटीने वाढ झाली असून ती दिवसेंदिवस साथीच्या आजारासारखी पसरत असून यातून कोणीही सुटणार नाही, अशी भीतीही अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांत जगभरातील 260 कोटी नागरिकांची वैयक्तिक माहिती लीक झाली आहे, असं या अहवालात म्हटलं.

रायगड जिल्ह्यात अंमली पदार्थ बनवणाऱ्या कारखान्यावर छापा, 106 कोटींचं ड्रग्ज जप्त

क्लाउड स्टोरेज ही आजच्या जगात डेटा स्टोरेज आणि सुरक्षिततेसाठी वापरली जाणारी पद्धत आहे. पण, आता आपल्याला भविष्यात अधिक सुरक्षित पर्यायांचा विचार करावा लागेल. एंड-टू-एंड एन्क्रिप्शन सारखी वैशिष्ट्ये वाढवण्याची गरज असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

ऍपल आपल्या वापरकर्त्यांचा डेटा एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह संरक्षित करते. गेल्या वर्षी, कंपनीने iCloud साठी Advanced Data Protection नावाचे वैशिष्ट्य जारी केले, जे वापरकर्त्यांच्या डेटाला अधिक संरक्षण प्रदान करते.

अॅपलची सुरक्षाही धोक्यात आली

काही दिवसांपूर्वी देशातील काही प्रमुख नेत्यांनी त्यांचे आयफोन हॅक होत असल्याचा आरोप केला होता. अॅपल कंपनीनेच त्यांना ही माहिती दिल्याचे सांगण्यात आले. यासोबतच गेल्या महिन्यात बातमी आली होती की 81.5 कोटी भारतीयांचा डेटा डार्क वेबवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. दोन आठवड्यांपूर्वी ताज हॉटेलच्या 15 लाख ग्राहकांचा वैयक्तिक डेटाही लीक झाला होता.

डेटा लीक झाल्यानंतर वैयक्तिक माहिती आणि ई-मेल आयडी, पासवर्ड, मोबाइल नंबर सगळंचं चोरीला जातं. त्याच्या मदतीने वैयक्तिक ब्लॅकमेलही करता येते.

त्यामुळं तुमचा वैयक्तिक डेटा कोणाशीही शेअर करू नका. व्हॉट्सअॅप, फेसबुक मेसेंजर आणि इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियावरही तुमचे खाजगी फोटो आणि फाइल्स कोणाशीही शेअर करू नका. तसेच थर्ड पार्टी अॅप्स वापरणे टाळा.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube