..ते ब्रँड ब्रँड करत असले तरी तो ब्रँड आम्ही संपवणार; भाजप नेते प्रसाद लाड यांचा ठाकरेंवर वार

Prasad Lad on Thackeray : शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आली आहे. (Thackeray) याच मुद्यावरुन भाजप आमदार प्रसाद लाड यांनी टीका केलीय. पहिल्या निवडणुकीलाच त्यांना पराभवाला सामोरं जावं लागणार असल्याचा टोला लाड यांनी लगावला आहे. लोकांचा विश्वास, लोकांची गर्दी या ब्रँडला बंद करायच्या तयारीला लागली आहे असंही ते म्हणाले आहेत.
स्वदेशी माल चालणार आहे असा माझा विश्वास असल्याचे प्रसाद लाड म्हणाले. ठाकरे बँड आम्ही या निवडणुकीत बंद करणार असल्याचे लाड म्हणाले. बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीतच्या मुद्यावर लाड यांनी ठाकरेंवर टीका केली. राज ठाकरे यांना या निवडणुकीबाबत कल्पनाही नसेल. पण उद्धव ठाकरे ब्रँड ब्रँड असं करत आहेत. सत्ता आल्यानंतर आदित्य ठाकरे कोण मनसे असं म्हणाले होते. आता उद्धव ठाकरे त्यांच्या पाया पडायला जात आहेत अशी टीका प्रसाद लाड यांनी केली.
Video : मुख्यमंत्री असताना शिंदेंनी मिळवलेला पैसा भाजपने कसा वापरला?, वडेट्टीवारांचे वादळी खुलासे
माझ्या पॅनलमध्ये सर्वसामान्य जनता आहे. तो जो ब्रँड आहे तो आम्ही हरवून बसलो आहोत. ट्रायल बेस युती आहे का हे मला माहिती नाही, मात्र सहकारांमध्ये राजकारण आणायचं नसतं. केवळ संस्थेचा विचार करायला पाहिजे. यांची 20-25 वर्ष सत्ता होती. तुम्ही केलं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. चार कोटीचे कार्यालय 24 कोटीला घेतले. पैसे घेऊन यांनी काय साध्य केलं? असा सवाल लाड यांनी लगावला. यावर आता पोलिसांनी नोटीस देखील काढली आहे, भ्रष्टाचाराचा हिशोब त्यांना द्यावा लागेल असे लाड म्हणाले.
संजय राऊत यांचं चालल तर ते डोनाल्ड ट्रम्प बरोबरही उद्धव ठाकरे यांची युती करतील असा टोला लाड यांनी लगावला. उद्या उद्धव ठाकरे आणि ट्रम्प एकत्र आले तर टेरिफ वाढला तर त्यावर आश्चर्य वाटायला नको असे लाड म्हणाले. बेस्ट कामगार पतपेढीची निवडणूक आमच्यासाठी प्रतिष्ठेशी नसून बेस्ट कामगाराच्या सन्मानाची असल्याचे भाजप आमदार प्रवीण दरेकर म्हणाले. 25 वर्ष बेस्ट कामगारांना वेठबिगारांसारखे गृहीत धरलं. त्यांच्या आयुष्यात काही चांगलं घेता येईल का? कामगारांच्या ज्या मागण्या आहेत त्यांना काय आधार देता येईल का? हे आम्ही पाहत आहोत.
मिल कामगारांना घर मिळतात मग बेस्ट कामगारांना आम्ही घर का देऊ शकत नाही? असा विचारच कधी झाला नाही. म्हणून बेस्ट कामगारांच्या आयुष्याचा वृद्धी आणण्यासाठी पाच युनियनला सोबत घेऊन आम्ही समृद्धी पॅनल सामोरं जात आहोत. त्यांना कामगारांचं काही देणं घेण नाही. राज ठाकरेंची गरज आधी त्यांना लागली नाही. पण आता गरज लागत आल्यानं हात पुढे करण्यात आला आहे. कामगार प्रसाद लाड यांच्या मागे उभे राहतील असे दरेकर म्हणाले. राज ठाकरे येतात का जातात याची घाई राऊत यांना लागली आहे म्हणून त्यांचा जप सुरु आहे असंही ते म्हणाले आहेत.