Manoj Jarange : शुगर लेव्हल कमी, वजनही 7 किलोने घटलं; मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत अपडेट काय?
Manoj Jarange : मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत असणाऱ्या विविध मागण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून आंतरवली
Manoj Jarange : मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत असणाऱ्या विविध मागण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून आंतरवली सराटीत उपोषणाला बसले आहे. आज (8 सप्टेंबर) त्यांच्या उपोषणाचा 11 वा दिवस असून सध्या समोर आलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती ढासळत आहे. माहितीनुसार, सोमवारी रात्री त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. त्यांची शुगर लेव्हल कमी झाली असून त्यांचे वजन देखील 7 किलोने कमी झाल्याची माहिती जालना येथील सिव्हिल सर्जन यांनी केलेल्या तपासणीनंतर दिली.
तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळत असल्याची माहिती मिळताच सोमवारी रात्री अडीच वाजता मंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी जरांगे पाटील यांना फोन करत सलाईन घेण्याची विनंती केली होती. यानंतर जरांगे पाटील यांनी सलाईन लावले. गेल्या अकरा दिवसांपासून अन्नाचा एक कणही खाल्लेला नाही. काही दिवसांपूर्वी त्यांनी सरकारच्या विनंतीवरुन एकदा पाणी प्यायले होते मात्र उपोषण सोडण्यास त्यांनी नकार दिला होता. तसेच जर मागण्या मान्य न झाले तर मुंबई येणार असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) उपोषणावर ठाम असल्याने राज्य सरकारने देखील काही मोठे निर्णय घेत मराठा समाजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या प्रवगार्तील विद्यार्थ्यांना ओबीसी आरक्षणाचे लाभ मिळणार आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून सर्व शैक्षणिक सवलतींचा लाभ मराठा, एसईबीसी, कुणबी – मराठा आणि मराठा- कुणबी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. तसेच मराठा व कुणबी तरुणांसाठी मोफत ड्रायव्हिंग आणि कंडक्टर प्रशिक्षणाची व्यवस्थाही देखील राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 11 वा दिवस; मराठा,कुणबी विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा-
तर दुसरीककडे ईबीसी, ईडब्यूएस आणि एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित वसतिगृह निर्वाह भत्त्यासाठी राज्य सरकारने 200 कोटी रुपयांचा निधी तात्काळ मंजूर केला आहे.