जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 11 वा दिवस; मराठा,कुणबी विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंतरवली सराटीत मराठा समाजाच्या आरक्षणातील प्रलंबित मागण्यासाठी

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंतरवली सराटीत मराठा समाजाच्या आरक्षणातील प्रलंबित मागण्यासाठी तसेच मराठा कुणबी जातप्रमाणपत्रासाठी उपोषण करत आहे. 29ऑगस्टपासून सुरु असणाऱ्या या उपोषणाचा आजचा 11 वा दिवस असून दिवसेंदिवस या उपोषणाला मराठा समाजाचा मोठा पाठिंबा मिळत आहे. तर दुसरीकडे आता राज्य सरकारने देखील मराठा समाजासाठी काही मोठे निर्णय जाहीर केले आहे. राज्य सरकारने सोमवारी मराठा, मराठा – कुणबी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या प्रवगार्तील विद्यार्थ्यांना ओबीसी आरक्षणाचे लाभ मिळणार आहे.

शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून सर्व शैक्षणिक सवलतींचा लाभ मराठा, एसईबीसी, कुणबी – मराठा आणि मराठा- कुणबी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. तसेच मराठा व कुणबी तरुणांसाठी मोफत ड्रायव्हिंग आणि कंडक्टर प्रशिक्षणाची व्यवस्थाही देखील राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. तर दुसरीककडे ईबीसी, ईडब्यूएस आणि एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित वसतिगृह निर्वाह भत्त्यासाठी राज्य सरकारने 200 कोटी रुपयांचा निधी तात्काळ मंजूर केला आहे.

कायदेशीर चौकटीत मराठा समाजाला आरक्षण देण्यावर सरकार ठाम – राधाकृष्ण विखे-पाटील

तर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर मागण्यावर भाष्य करत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले की, सरकारने काहीही चुकीचे केलेले नाही. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायदेशीर चौकटीत मराठा समाजाला आरक्षण देण्यावर सरकार ठाम आहे. पात्र लाभार्थ्यांना हक्काचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी प्रशासनाला स्पष्ट सूचना देण्यात आल्याची देखील माहिती त्यांना माध्यमांशी बोलताना दिली.

राज्यात आज विजांसह मुसळधार पाऊस; ‘या’ 5 जिल्ह्यांना अलर्ट जारी

follow us