Video : जरांगे पाटलांशी मैत्री अन् लक्ष्मण हाके यांना थेट आव्हान; ऐका प्रसाद लाड यांची सविस्तर मुलाखत
राजकारण, समाजकारण आणि व्यवसाय यामधील सर्व प्रवास भाजप आमदार प्रसाद लाड यांनी उलगडला आहे. ते लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
राजकारणात काम करतो पण सामाजिक (BJP) कामाचं भान ठेऊन काम करतो. त्यामुळं जे मिळतय त्यामध्ये समाधानी आहे. कुणाविषयी राग, द्वेष किंवा मत्सर नाही. माझे सासरे आमदार होते, त्यांनी मला सांगितलं पुढील काळात आर्थिक सक्षम असशील तर राजकारण करू शकतो. अन्यथा, ते कठीण आहे. मग मी राजकारणाच्या अगोदर व्यवसायाकडं वळलो. त्यामध्ये मी यशस्वी झालो. पण मी समाधानी आहे का? तर नाही. समाधानी माणूस संपलेला असतो, त्यामुळं एका ध्येयाने मी काम करतो, असं म्हणत राजकारण, समाजकारण आणि व्यवसाय यामधील सर्व प्रवास भाजप आमदार प्रसाद लाड यांनी उलगडला आहे. ते लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
आज समाजकारणात काम करताना एखाद्या मुलाची फी भरली, एखाद्या रुग्णाला मदत केली आणि त्यामध्ये त्याला यश आलं तर त्यासारखं दुसरं सुख नाही असं म्हणत त्यांनी आपल्याला समाजकारणाची आवड आहे हे सांगितलं. दरम्यान, प्रसाद लाड यांना काय व्हायचं आहे असं विचारलं असता, राजकारणात अपेक्षा सगळ्यांनाच असते. माझ्या सोबतचे अनेकजण मंत्री झाले, पुढं गेले. परंतु, मी झालो नाही याबाबत मला काही शल्य नाही. पण अपेक्षा आहे. आज राजकारणात सर्वात महत्वाचं म्हणजे वेळ येणं महत्वाचं असतं. त्यामुळं माझ्या नेतृत्वाला आणखी वाटलं नसेल की, याला हे दिलं पाहिजे. पण वेळ आल्यावर ते नक्की माझा विचार करतील असंही ते म्हणाले.
यावेळी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यावरील टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं आहे. मी 30 वर्षापासून राजकारणात आहे. त्यामुळं हाके यांनी असंली कुठं हाणू आणि मारू असली भाषा वापरू नये. आणि हेच बोलायचं असेल तर कुठं यायचं आणि कधी यायचं हे सांगा असं आव्हानही त्यांनी दिलं आहे. त्याचबरोबर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माझ्यावर हाके यांच्यापेक्षा वाईट भाषेत टीका केली आणि त्यांच्याच भाषेत मी उत्तर दिली आहेत. परंतु, पुढं त्यांनाही कळलं की हा चांगलं काम करणारा आहे आणि मलाही लक्षात आलं की जरांगे हे फक्त समाजासाठी काम करतात. त्यामुळं एकमेकांना सहकार्यांची आमची भूमिका आहे असंही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, आम्ही परळ भागात वाढलेलो आहोत. आम्ही मुंबईचे अंडरवर्ड पाहिले आहेत. त्यामुळं अशी भाषा हाके यांनी वापरू नये असा थेट दमच त्यांनी यावेळी हाके यांना दिला आहे. जरांगे पाटील यांनी आमचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविषयी जी भाषा वापरली ती मला पटली नाही, त्याचा मी निषेध करतो. पण जरांगे पाटील यांना काही शंका असतील त्या बावनकुळे यांच्याशी बोलून दूर झाल्या पाहिजेत असं मला वाटतं असंही ते म्हणाले आहेत.