रायगड जिल्ह्यात अंमली पदार्थ बनवणाऱ्या कारखान्यावर छापा, 106 कोटींचं ड्रग्ज जप्त

  • Written By: Published:
रायगड जिल्ह्यात अंमली पदार्थ बनवणाऱ्या कारखान्यावर छापा, 106 कोटींचं ड्रग्ज जप्त

रायगड : रायगड जिल्ह्यातील खोपोली एमडी ड्रग्ज (MD Drugs) बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. मौजे ढेकू गावच्या हद्दीत इंडिया पोल्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या नावाने हा ड्रग्जचा कारखाना सुरू होता. यामध्ये 106 कोटी 50 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले आहे. दरम्यानो, याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

भाजपच्या नऊ खासदारांना दिली बंगले रिकामे करण्याची नोटीस, हे आहे कारण… 

हा एमडी ड्रग्जचा कारखाना विद्युत खांब तयार करण्याच्या नावाखाली चालवला जात होता. या कंपनीत ड्रग्ज बनवले जातात, ही गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांच्या पथकाने कारखान्यावर छापा टाकला. यामध्ये पोलिसांना 85 किलो 200 ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडले. याशिवाय 15 लाख रुपयांचे रसायनही पोलिसांनी जप्त केले आहे.
तसेच यावेळी पोलिसांनी 65 लाख रुपयांची उपकरणे आणि 107 कोटी रुपयांचा माल जप्त केली. या कारवाईमुळे रायगड जिल्ह्यात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं.

काँग्रेस खासदाराच्या सापडलं 200 कोटींचं घबाड; मशीनने पैसे मोजून ट्रकमधून नेल्या नोटा… 

ढेकू गावाच्या हद्दीत इंडिया इलेक्टिक पोल्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा फलक आहे. या कंपनीत आममध्ये आंचल केमिलक नावाची दुसरी एक कंपनी सुरू होती. या कंपनीत बेकायदेशीरपणे प्रतिबंधित अंमली पदार्थ बनवले जात असल्याची खबर पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने कारखान्यावर छापा टाकला. यावेळी कंपनीत उग्र वास येत असल्याचं निदर्शनास आलं. येथे काही कच्चा माल तसेच त्यावर प्रक्रिया करण्यासाठी लागणारी उपकरणे एकत्र केलेली दिसली. कंपनी प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे रासायनिक प्रक्रिया करून पदार्थ बनवण्याची कुठलीही वैध परवानगी नसल्याचं दिसून आलं. मात्र, रासायनिक प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारून या ठिकाणी गुंगीकारक आणि प्रतिबंधीत मेफेड्रोन तयार केलं जात हातं. नार्को इन्स्पेक्शन कीट द्वारे तपासली असता सदर तयार केलेला माल हा एमडी ड्रग्ज असल्याचं निष्पन्न जालं.

या जप्तीनंतर संबंधित कंपनी बंद करण्यात आली असून कमल जेसवानी (४८), मतीन शेख (४५) आणि अँथनी कुरुकुटीकरन या तिघांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, सध्या राज्यात अंमली पदार्थांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यामध्ये घमासान होत असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणात चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केला. त्यामुळं आता राज्य शासन या ड्र्ग्जच्या प्रकाऱणात कोणती कठोर पावलं उलणार हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube