‘आधी टोमॅटो अन् आता कांद्याचे भाव पाडले’; शेतकऱ्यांनी मोदींच्या अभिनंदनाचे बॅनरच झळकवले
Ahmednagar News : राज्यात सध्या कांदा निर्यात शुल्काच्या मुद्द्यावरुन चांगलच वादंग पेटल्याचं दिसून येत आहे. एकीकडे निर्यात शुल्कात वाढ केल्यानंतर कांदा उत्पादकांमधून संतापाची लाट उसळताच शेतकऱ्यांचा दोन लाख टन कांदा खरेदी करण्यात निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यावरुनही केंद्र सरकारवर शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे. अशातच आता अहमदनगरमधील पारनेरमध्ये कांद्याचे भाव पाडल्याबद्दल मोदी सरकारचं अभिनंदन करत बॅनरबाजी केली आहे. या बॅनरबाजीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी मोदी सरकारच्या निर्णयावरुन संताप व्यक्त केला आहे. सध्या या बॅनरचीच सर्वत्र चर्चा सुरु आहे.
कार्यकर्त्याचा मुलगा दुर्धर आजाराने ग्रस्त; गल्ली बोळातून वाट काढत राज ठाकरे चिमुकल्याच्या भेटीला
पारनेमधील जवळा गावातील मुख्य बाजारपेठेत हा बॅनर लावण्यात आला असून बॅनरवर ‘टोमॅटोचे भाव पाडून झाल्यावर कांद्याचे भावदेखील पाडण्यासाठी तातडीने प्रयत्न केल्याबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन’ असा मजकूर लिहुन संताप व्यक्त करण्यात आला आहे. तसेच बॅनरच्या शेवटी केंद्र सरकारला नवी हिटलरशाही’ असं नाव देत टीकाही करण्यात आली आहे.
‘पवार साहेब चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री’; सुळेंचे वळसे पाटलांना सणसणीत प्रत्युत्तर
केंद्र सरकारने काय निर्णय घेतला?
राज्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला. या निर्णायवरुन राज्यात वादंग पेटल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा दोन लाख मेट्रीक टन कांदा नाफेडच्या माध्यमातून 2410 रुपये दराने खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला. हा निर्णय जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देणार निर्णय असल्याचं स्पष्टीकरण राज्य सरकारकडून देण्यात आलं होतं.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर नवी जबाबदारी, निवडणुक आयोगाचा नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्त
राज्यात दरवर्षी 50 लाख टन कांदा उत्पादित केला जातो, तर दररोज एक लाख टन कांदा मार्केटमध्ये विकला जातो, केंद्र सरकारच्या निर्णयानूसार दोन लाख टन कांदा दोन दिवसांत खरेदी करणार आहे, त्यानंतरचा कांद्याचं काय? असा सवाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून केला जात आहे.
दरम्यान टोमॅटोचे भाव सुद्धा केंद्र सरकारमुळे कमी केल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये असून केंद्र सरकारविषयी असलेला राग हा बॅनरबाजीच्या माध्यमातून झळकला. पारनेर तालुक्यातील जवळा या गावात मुख्य बाजारपेठेत मोदी सरकारचे अभिनंदन करण्याचा बोर्ड लावला आहे.