कार्यकर्त्याचा मुलगा दुर्धर आजाराने ग्रस्त; गल्ली बोळातून वाट काढत राज ठाकरे चिमुकल्याच्या भेटीला

कार्यकर्त्याचा मुलगा दुर्धर आजाराने ग्रस्त; गल्ली बोळातून वाट काढत राज ठाकरे चिमुकल्याच्या भेटीला

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना संवदेनशील मनाचे राजकारणी म्हणून ओळखले जाते. याचा प्रत्यत अनेकदा त्यांच्या जाहीर भाषणांमधून, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या खासगीत झालेल्या भेटीतील फोटोंमधून येत असतो. कधी ते कर्णबधिर मुलांमध्ये रमतात, तर कधी ते पदाधिकाऱ्याची पाट दुखत आहे, हे ऐकताच तेलाची वाटी घेऊन थेट त्याच्या पाठीला मालीश करुन देतात. राज ठाकरे यांचे श्र्वान प्रेमही जगजाहीर आहे. मध्यंतरी त्यांच्या श्र्वानाच मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यातील एक हळवे रुपही पाहायला मिळाले होते. (MNS Chief Raj Thackeray reached pimpari chinchwad to meet Raj Deshpande)

राज ठाकरे यांच्यातील संवेदनशील राजकीय नेत्याचा प्रत्यत पुन्हा एकदा आला. एका कार्यकर्त्याच्या मुलाच्या भेटीसाठी राज ठाकरे खास मुंबईहून थेट पिंपरी चिंडवडला आले. नुसतं आलेच नाहीत तर अगदी गल्लीबोळातून वाट काढत, चालत ते या कार्यकर्त्याच्या घरीही पोहचले. या भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

राज ठाकरे घरातून निघाले ही काय ‘ब्रेकिंग न्यूज’ होऊ शकते का? गौरव सोहळ्यात पत्रकारांवरच घसरले

नेमकं काय झालं?

विशाल देशपांडे हे पिंपरी-चिंचवडमधील मनसेचे स्थापनेपासूनचे कट्टर कार्यकर्ते आहेत. ते दापोडी येथे रिक्षा चालक असून त्यांची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. विशाल देशपांडे यांचा मुलगा राज देशपांडे हा जेमतेम 12 वर्षांचा आहे. त्याला शरीरातील मसल कमजोर करणारा ‘मस्क्युलर  डिस्ट्रॉफी’ या दुर्धर आजाराने ग्रासले आहे. या आजाराचा उपचार करण्यासाठी सुमारे 17 कोटींच्या घरात आहे. मात्र, विशाल यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने त्यांनी आशा सोडून दिली आहे.

मोठा बदल! तांबडं फुटाया अन् दगडूशेठच्या दर्शनाला यंदा लाखो पुणेकर मुकणार

पण आपले नेते राज ठाकरे यांच्या नावावरूनच आपल्या मुलाचं राज नाव ठेवलेल्या मुलाची राज ठाकरेंना भेटण्याची इच्छा आहे, ही गोष्ट पिंपरी चिंचवड येथील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना कळली. त्यानंतर त्यांनी ही गोष्ट राज ठाकरेंच्या कानावर घातली. त्यानंतर ठाकरेंनी कुठलाही विलंब न करता थेट मुंबईहून दापोडी गाठली आणि येथील देशपांडे यांच्या घरी चालत जाऊन राज या चिमुकल्याची भेट घेतली आहे.

यावेळी राज ठाकरे यांनी राजच्या आजाराबाबत विचारपूस केली. त्याच्याशी बराच वेळ गप्पाही मारल्या. त्यानंतर चिमुकल्या राजाने आपल्या अंगावरील पांढऱ्या शर्टवर राज ठाकरे यांची सही लिहून मागितली आणि ती इच्छा राज ठाकरेंनी तत्काळ पूर्ण केली. राज ठाकरे आणि छोट्या राज्यात भेटीचा व्हिडिओ सर्व सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झाला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube