मोठा बदल! तांबडं फुटाया अन् दगडूशेठच्या दर्शनाला यंदा लाखो पुणेकर मुकणार

  • Written By: Published:
मोठा बदल! तांबडं फुटाया अन् दगडूशेठच्या दर्शनाला यंदा लाखो पुणेकर मुकणार

पुणे : गणपती उत्सव म्हटलं की, डोळ्यांसमोर उभं राहतं ते पुणे शहर. पुण्यातील गणपतीच्या वेगवेगळ्या प्रथा, परंपरा, इथले मंडळांचे देखावे या सगळ्याची दरवर्षी चर्चा होत असते. त्याचप्रमाणे अनंत चतुर्थदशीला निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकीचीखील तेवढीच चर्चा होते. मानाच्या पाच गणपतींशिवाय दगडूशेठ गणपतीची (DagaduSheth Ganapati) विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी लाखो पुणेकर रस्त्यावर उतरतात. तांबडं फुटायला आणि दगडूशेठ गणपती अलका चौकात येण्याची परंपरा आहे. मात्र, यावर्षी लाखो पुणेकर या ‘याचि देही याचि डोळा’ असणाऱ्या या क्षणाला मुकणार आहेत. कारण यंदाच्या वर्षीपासून दगडूशेठच्या विसर्जन वेळेत मोठा बदल करण्यात आला आहे. याबाबत स्वतः मंडळाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

भारतात मुसळधार पाऊस, चांद्रयान 3 च्या लँडिंगवेळी कसं असणार चंद्रावर हवामान?

पुण्यातील गणपती उत्सवासाठी ज्या पद्धतीने विशेष तयारी केली जाते. त्याचप्रमाणे अनंत चतुर्थदशीला निघणाऱ्या मिरणुकीसाठीदेखील खास तयारी केली जाते. गेल्या अनेक वर्षांपासूनच्या परंपरेनुसार पहिले मानाचे पाच गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होतात. त्यानंतर शहरातील अन्य गणपती मंडळं त्यांना दिलेल्या टोकन नंबरप्रमाणे लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रत्यांवर उभे राहतात. सकाळी निघणाऱ्या मानाच्या पाच गणपतीसमोर ढोल ताशा पथक सहभागी झालेले असतात. तर, अनेक मंडळ रात्रीच्यावेळी विसर्जन रथावर करण्यात येणाऱ्या देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहेत.

‘ISRO’च्या मोहिमेत कंपन्यांचीही साथ; ‘L&T’ ने बनवलं ‘लाँच व्हेईकल’ तर ‘BHEL’ ने दिली ‘बॅटरी’..

दगडूशेठ अन् विसर्जन मिरवणूक

पुण्यातील अन्य मंडळांचे देखावे पाहण्यासाठी ज्याप्रमाणे लाखोंची गर्दी होते. त्याचप्रमाणे दरवर्षी श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा देखावा आणि त्याची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी लाखो भाविक गर्दी करतात. दरवर्षी दगडूशेठ गणपतीचे विसर्जन साधारण अनंत चतुर्थदशीच्या दुसऱ्या दिवशी पांचाळेश्वर घाटावर केले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून दगडूशेठ गणपती रात्रीच्या सुमारास विसर्जन मिरणुकीच्या रांगेत लागत असे. त्यानंतर लाखो भाविक दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेत विद्युत रोषणाई केलेल्या रथाचे छायाचित्र डोळ्यात वर्षभरासाठी साठवून घेतात.

Chandrayan 3 Landing : सॉफ्ट लँडिंगचे थेट प्रक्षेपण कसे, केव्हा आणि कोठे पाहता येणार?

दगडूशेठ गणपतीवर असलेली पुणेकर आणि पुण्याच्या बाहेरील भक्तांची असलेली भक्ती यामुळे मध्यरात्री निघूनही मंडळाला अलका चौकात येण्यासाठी काही तासांचा अवधी लागतो. गेल्या अनेक वर्षांपासून तांबडं फुटायला आणि दगडूशेठ अलका चौकात येण्याचा क्रम आहे. त्यासाठी अनेक भाविक काही मंडळांच्या मिरवणुका पाहून झाल्या की झोपं काढून ठरलेल्या वेळेत अलका चौकात उपस्थित राहतात. मात्र. यंदा हे चित्र दिसणार नाही. कारण यंदा दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी रांगेत रात्रीच्या वेळी नव्हे तर, दुपारी 4 वाजता लागणार आहे.

का करण्यात आला वेळेत बदल?

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हा यंदाच्या गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीच्या पहिल्याच दिवशी दुपारी 4 वाजता मिरवणुकीत सहभागी होणार असल्याचे दगडूशेठ हलवाई गणपती सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी बुधवारी (ता. २३) पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.चव्हाण म्हणाले, मागील अनेक वर्षे दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक परंपरेप्रमाणे मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे निघत असे. यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचे विसर्जन होत नाही. यासाठी यंदापासून हा बदल करण्यात आला आहे.

Chandrayaan 3 : चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगसाठी 23 ऑगस्टचं का?

लक्ष्मी रस्त्यावरून ही मिरवणूक निघत असे. परंतु, गणपती निघण्यास होणारा उशीर खूपच वाढत चालला आहे. मागील वर्षी दुसऱ्या दिवशी सकाळी 7.45 वाजता बेलबाग चौकात गणपतीचे आगमन झाले होते. यामुळे भाविकांना दर्शनासाठी खूप ताटकळत रहावे लागले होते. हे टाळण्यासाठी आणि भाविकांच्या भावनांचा विचार करून हा बदल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube