भारतात मुसळधार पाऊस, चांद्रयान 3 च्या लँडिंगवेळी कसं असणार चंद्रावर हवामान?

  • Written By: Published:
भारतात मुसळधार पाऊस, चांद्रयान 3 च्या लँडिंगवेळी कसं असणार चंद्रावर हवामान?

भारताच्या चांद्रयान 3 च्या लँडिंगकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असून, आज (दि. 23) संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी याचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले जाणार आहे. यासाठी इस्त्रोकडून संपूर्ण तयारी करण्यात आली असून, अनेकांना सध्या भारतात कोसळणाऱ्या पावसामुळे लँडिंगवेळी चंद्रावर नेमके हवामान कसे असेल असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे. तर, काहींच्या मनात चंद्रावर पाऊस पडतो का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भारतातील पावसाचा चांद्रयान 3 वर परिणाम होणार का?

भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या उत्तराखंड, हिमालयीन प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. राजधानी दिल्लीसह संपूर्ण एनसीआरमध्ये आज सकाळपासून पाऊस पडत आहे. म्हणजेच आज भारताच्या भूमीवर मुसळधार पाऊस पडत आहे. मग चांद्रयानच्या लँडिंगवर याचा काही परिणाम होईल का, हा मोठा प्रश्न आहे. तर याचे थेट उत्तर नाही असेच आहे.

कारण सध्या चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत असून, याला नियंत्रित करण्याचे काम बंगळुरूमधून केले जात आहे. त्यामुळे भारतात पाऊस असो वा वादळ, चांद्रयान मोहिमेवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, कोणत्याही यानाच्या लॉन्चिंग करताना हवामानाची काळजी नक्कीच घेतली जाते. याच कारणामुळे 14 जुलैला चांद्रयावन 3 च्या प्रेक्षेपणापूर्वी इस्रोने प्रेक्षेपणाची तारीख चार दिवसांसाठी राखून ठेवली होती.

चंद्रावर पाऊस पडतो का?

चंद्रावर वातावरण नसल्याने तेथे पाऊस पडू शकत नाही. याशिवाय तेथे पाणी नाही. पावसासाठी पाण्याचे बाष्पीभवन होणे आणि त्यातून ढग तयार होणे आवश्यक असते. म्हणजेच चंद्रावर पाऊस पडत नाही. याशिवाय सूर्यमालेच्या हालचालींमुळे अवकाशातील हवामान बदलत राहते. येथे हवामानाचे चक्र सूर्य, उल्का इत्यादींमधून येणार्‍या किरणांवरून ठरते.

चंद्रावर वातावरण नसल्यामुळे त्याचा परिणाम तेथील पृष्ठभागावरही दिसून येतो. चंद्राच्या एका बाजूला दक्षिण ध्रुव आहे जो पूर्णपणे अंधारात बुडालेला आहे तर, दुसरीकडे उत्तर ध्रुवावर प्रकाश आहे. या ग्रहावर सौर वारे आणि उल्का येत राहतात, त्यामुळे त्याचा परिणाम त्याच्या पृष्ठभागावरही दिसून येतो. म्हणूनच चंद्रावर दिसणारे खड्डे खूप खोल असू शकतात असे म्हटले जाते.

चंद्रावरील तापमान नेमकेकिती?

अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या म्हणण्यानुसार, चंद्रावर सौर किरणे आणि सौर वादळे येत असल्याने येथील तापमान देखील असामान्य आहे. तसे, चंद्रावरील तापमान दिवसा 120 अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकते. त्याचवेळी रात्रीचे तापमान हे -130 ते -140 अंशांपर्यंत खाली जाऊ शकते. विशेष म्हणजे एक चंद्राचा दिवस पृथ्वीच्या 14 दिवसांच्या बरोबरीचा असतो.

नासाच्या म्हणण्यानुसार, पृथ्वीप्रमाणेच चंद्राच्या पृष्ठभागावरील मोठे खड्डे किंवा खुणा वेळेनुसार बदलत नाहीत. त्यामुळे येथे असमान तापमान आढळते. याच कारणामुळे तेथे काही ठिकाणी अंधार आहे, तर काही ठिकाणी भरपूर प्रकाश आणि उष्णता आहे. ज्याप्रमाणे चंद्राचा दिवस पृथ्वीच्या १४ दिवसांच्या बरोबरीचा असतो, त्याचप्रमाणे चंद्राची रात्र पृथ्वीच्या १४ दिवसांइतकी असते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube