तुला तर नाहीच, तुझ्या मास्टरमाईंडलाही भीत नाही; तुरुंगातून तुला थर्ड लावेन, रामराजे निंबाळकर आक्रमक
माझ्या नादी लागू नका. दुसऱ्याला माझे नाव घ्यायला लावण्यापेक्षा स्वतः माझं नाव घ्या, मी वाटच बघतोय. मी कोणाला घाबरत नाही.
स्वतःच्या लेटर हेडवर पटकथा लिहून आगवणे यांच्या मागे ईडी कोणी लावली, हे सर्वांना माहीत आहे. (Nimbalkar) सुरवडीच्या प्रल्हाद साळुंखे पाटील यांनी माझे नाव घेतले. त्यांना मी सोडणार नाही. मी आधीच सांगितले होते. माझ्या नादी लागू नका. दुसऱ्याला माझे नाव घ्यायला लावण्यापेक्षा स्वतः माझं नाव घ्या, मी वाटच बघतोय. मी कोणाला घाबरत नाही असा थेट इशारा विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला.
तुमच्यामागचा मास्टर माइंड कोण आहे. त्यालाही मी घाबरत नाही. या वयात मला तुरुंगात टाकलं तरी चालेल, मी तुरुंगात बसून त्यांना थर्ड लावेन असंही ते म्हणालेत.पीडिता डॉक्टर युवतीच्या आत्महत्येप्रकरणात मी षडयंत्र केल्याचा आरोप होत आहे. आत्महत्या झाली, त्या दिवशी मी पुण्यात होतो. त्यांच्यावर टीका करणाऱ्या सुषमा अंधारे व जयश्री आगवणे यांचा माझ्याशी सबंध नाही. एक फोन कॉल मी ऐकला. त्यात त्यांना सांगण्यात येत होते.
Video : रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या काळात सर्व अधिकारीच त्यांचे कार्यकर्ते; रामराजेंचा थेट घणाघात
तुम्ही रामराजे यांचे नाव घ्या, आपण सगळे विषय मिटवू असं यावेळी रामराजे म्हणाले, माजी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, प्रगती कापसे आदी उपस्थित होते. यावेळी रामराजे म्हणाले. तसंच फलटणमधील नाईक निंबाळकर घराण्याला १,२०० वर्षांचा इतिहास आहे. असंही ते म्हणाले.
श्रीमंत मालोजीराजे यांचे संस्कार आमच्यावर आहेत. या संस्कारातूनच आमच्याकडून आत्तापर्यंत सेवा झाली. इतिहासाला काळिमा लावणारी घटना येथे घडली. मी पाच वर्षापासून सांगतोय काळा इतिहास असणारी ही माणसं तुमच्या उंबऱ्यात आली आहेत. त्यांना वेळीच रोखायची जबाबदारी तुमची आहे, अशी टीका रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केली.
