Ramraje Naik Nimbalkar : ‘…तर आम्हाला तुतारी वाजवायला वेळ लागणार नाही’; राजराजे निंबाळकरांचे सूचक विधान

  • Written By: Published:
Ramraje Naik Nimbalkar : ‘…तर आम्हाला तुतारी वाजवायला वेळ लागणार नाही’; राजराजे निंबाळकरांचे सूचक विधान

Ramraje Naik-Nimbalkar : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) सर्वच पक्षांची तयारी जोरात सुरू झाली आहे. मात्र, भाजप आणि अजित पवार गटाचे अनेक नेते शरद पवार यांच्या संपर्कात आहेत. अशातच अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar) यांनी तुतारी फुंकण्याचे संकेत दिले. भाजपचे णजित नाईक निंबाळक (Ranjit Naik Nimbalkar) आणि जयकुमार गोरे यांच्या तक्रारींची दखल न घेतल्यास पुढील काळात तुतारी हातात घेऊ, असा इशारा रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला आहे.

Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठी’च्या घरातली ‘ही’ बनवाबनवी पाहिलीत का? 

राज्यात महायुतीतील अंतर्गत कलह शिगेला पोहोचला आहे. महायुतीत सहभागी झाल्यानंतर मुस्लिम मतदार दुरावला असल्याने राष्ट्रवादीचे अनेक नेते पुन्हा शरद पवारांच्या संपर्कात जात आहे. फलटणमध्ये माजी विधानसभा अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आज कार्यकर्त्यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर जोरदार हल्लाबोल करत तुतारी फुंकण्याचे संकेत दिले. रणजित नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्या तक्रारींची दखल न घेतल्यास पुढील काळात तुतारी हातात घेऊ, असा इशारा रामराजेंनी दिला. ते म्हणाले, रणजितसिंह नाईक – निंबाळकर आणि त्यांचे सहकारी गल्लोगल्ली दहशत माजवत आहेत. त्यांच्या दहशतीला सपोर्ट करू नका, एवढीच आपली तक्रार आहे. फरक पडला तर ठीक, अन्यथा तुतारी वाजवायला किती वेळ लागणार नाही,  असा थेट इशारा त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला आहे.

ऐन विधानसभेपूर्वी अजितदादांच्या अडचणीत वाढ, शिखर बॅंक घोटाळ्यातील क्लीन चिट विरोधात चार नवीन याचिका दाखल…. 

महायुतीत भाजपकडे असलेल्या माढा मतदारसंघातील रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीला रामराजे यांनी कडाडून विरोध केला. प्रत्यक्ष निवडणुकीतही रामराजेंच्या गटाने राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे उमेदवार धर्मशील मोहिते-पाटील यांचेच काम केलं. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या विजयानंतर आता रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी रामराजेंच्या निकटवर्तींयांची फोडाफोडी सुरू केली.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी (२ सप्टेंबर) फलटण दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी रामराजेंच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची रविवारी बैठक झाली. या बैठकीत रामराजेंनी आपली भूमिका जाहीर केली आहे. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याविरोधात तक्रार करणार असल्याचे सांगितले. आपलं भांडण भाजपशी नाही. माजी खासदार सोबत आहे. ते आणि त्यांचे साथीदार गल्लोगल्ली दहशत करत आहेत. त्याला साथ देऊ नका. अन्यथा तुतारी फुंकालया किती वेळ लागेल, असा थेट इशारा रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सध्या रामराजे हे तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा रंगू लागली. दरम्यान, रामराजेंनी घेतलेल्या भूमिकेवर अजित पवार नेमके काय बोलणार? हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube