ऐन विधानसभेपूर्वी अजितदादांच्या अडचणीत वाढ, शिखर बॅंक घोटाळ्यातील क्लीन चिट विरोधात चार नवीन याचिका दाखल….

  • Written By: Published:
ऐन विधानसभेपूर्वी अजितदादांच्या अडचणीत वाढ, शिखर बॅंक घोटाळ्यातील क्लीन चिट विरोधात चार नवीन याचिका दाखल….

Ajit Pawar : ऐन विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शिखर बँक घोटाळ्यात अजित पवार यांना ईओडब्ल्यूने (आर्थिक गुन्हे शाखा) क्लीन चिट दिल्यानंतर आता त्या निर्णयाला विरोध करण्यात आला. विशेष म्हणजे, चार नवीन याचिका मुंबई सत्र न्यायालयात (Bombay Sessions Court) दाखल झाल्या आहेत. या आव्हान देणाऱ्या याचिकेवर आता 5 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळं 25 हजार कोटींच्या शिखर बँक घोटाळ्यात अजित पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरातील अंकिताचा प्रवास संपला, घरा बाहेर पडतानाचा व्हिडीओ व्हायरल 

सप्टेंबर 2020 मध्ये, आर्थिक गुन्हे शाखेने प्रथमच या संदर्भात अजित पवार यांना क्लीन चिट देणारा क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. ला, ज्यात अजित पवार यांना दोषी ठरवण्याचे कोणतेही ठोस पुरावे नसल्याचे सांगण्यात आलं होतं. आता या क्लीन चिटला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार हे सध्या जनसन्मान यात्रा काढत आहेत. या निमित्ताने ते राज्यभर दौरा करत असतांना त्यांच्या अडचणीत आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या शिखर बँक घोटाळ्याची सुनावणी विशेष सत्र न्यायाधीश आदिती कदम यांच्या खंडपीठासमोर सुरू आहे. याच सुनावणीदरम्यान मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. मात्र, त्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयात चार याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यात माणिक भीमराव जाधव यांच्यासह अनिल विश्वासराव गायकवाड, नवनाथ साबळे आणि रामदास शिंदे यांनी ज्येष्ठ विधिज्ञ सतीश तळेकर यांच्यामार्फत या चार स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांमध्ये आरोप करण्यात आलेत की, ईओडब्ल्यूने अजित पवार यांच्या विरोधातील खटला बंद करण्यासाठी दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट हा अपुरा आहे.

Pune Crime : वनराज आंदेकर हत्येप्रकरणी तिघांना अटक, हत्येचं धक्कादायक कारणही उघड 

दरम्यान, शिखर बँक घोटाळा प्रकरणातील घोटाळा आणि क्लोजर रिपोर्टची सुनावणी आता 5 ऑक्टोबरला होणार आहे. जरंडेश्वर, जय अंबिका, जालना, पारनेर, कन्नड, प्रियदर्शिनी, पद्मश्री विखे पाटील या सहकारी साखर कारखानदारांनी ही निषेध याचिका दाखल केली आहे. मुंबई सत्र न्यायालयात दाखल याचिकांवर ऑक्टोबरमध्ये सुनावणी होणार असून या सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

काय प्रकरण आहे?
शिखर बँक घोटाळा हा 25 हजार कोटींचा मोठा आर्थिक घोटाळा आहे. या प्रकरणात अजित पवार यांचे नाव आहे. या प्रकरणाची विविध स्तरांवर तपास करण्यात आला. ईओडब्ल्यूकडून ‘क्लीन चिट’ मिळाल्यानंतर अजित पवारांविरोधात 4 याचिका दाखल झाल्या आहेत. ईओडब्ल्यूने दिलेल्या ‘क्लीन चिट’ला आव्हान देण्यात आल्याने आणि नव्या याचिकांवर सुनावणी होणार असल्याने विधानसभेपूर्वी अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube