Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरातील अंकिताचा प्रवास संपला, घरा बाहेर पडतानाचा व्हिडीओ व्हायरल

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरातील अंकिताचा प्रवास संपला, घरा बाहेर पडतानाचा व्हिडीओ व्हायरल

Bigg Boss Marathi New Season Day 36 : प्रसिद्ध सोशल मीडिया (Social Media) इन्फ्लुएंसर अंकिता प्रभू वालावलकर (Ankita Prabhu Walawalkar) अर्थात ‘कोकण हार्टेड गर्ल’ (Kokan Hearted Girl) सध्या ‘बिग बॉस मराठी’मुळे (Bigg Boss Marathi New Season) चर्चेत आहे. पण अंकिता प्रभू-वालावलकरचा ‘बिग बॉस मराठी’मधला प्रवास आता संपला आहे. बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) घरावर कोकणाच्या चेडवाचा राज पाहायला मिळाला. पण अंकिता आता अचानक घराबाहेर पडल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by LetsUpp Marathi (@letsupp.marathi)


‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो सर्वांना थक्क करणारा आहे. या प्रोमोमध्ये रितेश भाऊने सांगितले आहे की, ‘या घरातून बाहेर जाणाऱ्या सदस्याचं नाव आहे अंकिता”. त्यानंतर अंकिता तिच्या नावाची पाटी घेऊन सर्व सदस्यांची भेट घेऊन घराबाहेर पडताना पाहायला मिळाले आहे. अंकिताचा प्रवास संपल्याने डीपी दादा आणि सूरजला अश्रू अनावर झालेले बघायला मिळत आहेत.

‘बिग बॉस मराठीच्या घरात आता खेळाला रंगत येऊ लागली आहे. अशातच आता ‘बिग बॉस मराठी’च्या घराची पहिली कॅप्टन अंकिता प्रभू-वालावलकर (Ankita Prabhu Walawalkar) घराबाहेर पडली आहे. अंकिताने बिग बॉस मराठीचा खेळ चांगल्या खेळण्याचा प्रयत्न केला असला तरी कुठेतरी ती कमी पडल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळाले आहे.

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात फक्त रिअॅलिटी चालते, रितेश देशमुखने थेट सुनावलं

‘बिग बॉस मराठी’च्या घरात फक्त रिअॅलिटी चालते’

गेल्या आठवड्यात काहींचा तोंडावरचा ताबा सुटला. (Bigg Boss Marathi New Promo) दोन सदस्य विरोधात इतर सदस्य असं इक्वेशन आठवडाभर पाहायला मिळालं. आज ‘भाऊच्या धक्क्या’वर या बदललेल्या इक्वेशनवर चर्चा होणार आहे. भाऊच्या धक्क्यावर बिग बॉस मराठीच्या घरात फक्त रिअॅलिटी चालते, असं म्हणत रितेश भाऊ (Riteish Deshmukh) अरबाजची कानउघडणी घेताना दिसणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube