Bigg Boss Marathi 5: ‘आम्ही कुरघोड्या करायला आलेलो नाही’ टीश्यूवरुन बिग बॉसच्या घरात वाद!

Bigg Boss Marathi 5: ‘आम्ही कुरघोड्या करायला आलेलो नाही’ टीश्यूवरुन बिग बॉसच्या घरात वाद!

Bigg Boss Marathi New Season 34 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य (Bigg Boss Marathi New Season) कधी कोणत्या कारणाने एकमेकांसोबत वाद घातलील हे सांगू शकत नाही. (Bigg Boss Marathi ) आज घरात शुल्लक टिश्यू पेपरवरुन वाद रंगलेला पाहायला मिळणार आहे. (Bigg Boss Marathi New Promo) ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सदस्य एकमेकांवर कुरघोडी पाहायला मिळणार हेत. प्रेक्षकांना मात्र त्यांच्यातील रंगलेला हा वाद बघताना चांगलीच मजा येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये सदस्य (Bigg Boss Marathi New Promo) एकमेकांच्या कुरघोडी करताना दिसत आहेत. प्रोमोमध्ये निक्की (Nikki) म्हणतेय,”आम्हाला टिश्यू दिसला तर आम्ही तसचं ठेऊ”. त्यावर अरबाजने (Arbaaz) थेट सांगितले आहे की, “निक्कीने उचलला तर त्यात कमीपणा नाही आहे”. अभिजीत (Abhijit) म्हणतो,”एकमेकांच्या कुरघोड्या करू नका”. अभिजीतला उत्तर देत डीपी दादा स्पष्ट सुनावलं की,”आम्ही कुरघोड्या करायला आलेलो नाही. निक्की आता चुकतेय असं तुला वाटत नाही का?”. अभिजीत म्हणतो,”जे चुकत आहेत त्यांनी स्वत: समजावं”. यावर निक्की म्हणते,”असं असेल तर प्रत्येकाने आपलं आपलं काम स्वत: करा”.

‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य आता विभागले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्यातील ड्रामा पाहणं इतरांसाठी मात्र मनोरंजक ठरत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या या आठवड्यात सदस्यांचा चांगलाच धुमाकूळ पाहायला मिळत आहे.

मी ‘बिग बॉस मराठी’च्या घराची क्वीन

‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांचं 24 तास नाट्य सुरूच असतं. त्यामुळे एपिसोड व्यरिक्त घरातील सदस्य काय धिंगाणा घालतात हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. आजच्या ‘UNSEEN UNDEKHA’मध्ये निक्की अभिजीतला “मी ‘बिग बॉस मराठी’च्या घराची राणी आहे असं म्हणताना दिसणार आहे. तर आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील ग्रुपचा गेम होणार का हेदेखील पाहावे लागेल.

Bigg Boss Marathi: ‘फार हसू येतंय का? ‘बिग बॉस’ने घेतली डीपी अन् अंकिताची फिरकी

‘बिग बॉस मराठी’मध्ये आज निक्की अभिजीतला म्हणतेय,”आपण दोघं सोडलो तर बाकीच्यांचा मस्त एक ग्रुप झालाय. ग्रुप A मध्ये निक्की, अरबाज, वैभव आणि जान्हवी होते. B ग्रुपमध्ये अभिजीत आणि इतर मंडळी होते. हा ग्रुप खूप बोरिंग होता. पण A ग्रुपमध्ये मजा होती. आता A ग्रुपमधून निक्की आऊट झाली आहे. तर B ग्रुपमधून अभिजीत आऊट झालाय. दोन्ही ग्रुपचा कर्ता नसल्याने इतरांना ते ग्रुप चालवता येत नाही आहेत. लीडर्स वेगळे झाल्याने इतर सदस्य एक झाले आहेत. भांडण करणाऱ्या निक्कीला परत ग्रुपमध्ये घ्यायचं नाही, असं त्यांनी ठरवलं आहे. A आणि B एकत्र झाले आहेत. तीन दिवसांत तूदेखील त्यांच्यात सहभागी होणार आहेस”.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube