BB Marathi: निक्की थेटच म्हणाली, “मी ‘बिग बॉस मराठी’च्या घराची क्वीन’, होणार का आता ग्रुपचा गेम?

BB Marathi: निक्की थेटच म्हणाली, “मी ‘बिग बॉस मराठी’च्या घराची क्वीन’, होणार का आता ग्रुपचा गेम?

Bigg Boss Marathi New Season Day 34: ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील (Bigg Boss Marathi ) सदस्यांचं 24 तास नाट्य सुरूच असतं. त्यामुळे एपिसोड व्यरिक्त घरातील सदस्य काय धिंगाणा घालतात हे (Bigg Boss Marathi New Season) जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. आजच्या ‘UNSEEN UNDEKHA’मध्ये निक्की अभिजीतला “मी ‘बिग बॉस मराठी’च्या घराची राणी आहे असं म्हणताना दिसणार आहे. तर आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील ग्रुपचा गेम होणार का? हे देखील पाहावे लागणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


‘बिग बॉस मराठी’मध्ये आज निक्की (Nikki) अभिजीतला (Abhijit) म्हणतेय,”आपण दोघं सोडलो तर बाकीच्यांचा मस्त एक ग्रुप झालाय. ग्रुप A मध्ये निक्की, अरबाज, वैभव आणि जान्हवी होते. B ग्रुपमध्ये अभिजीत आणि इतर मंडळी होते. हा ग्रुप खूप बोरिंग होता. पण A ग्रुपमध्ये मजा होती. आता A ग्रुपमधून निक्की आऊट झाली आहे. तर B ग्रुपमधून अभिजीत आऊट झालाय. दोन्ही ग्रुपचा कर्ता नसल्याने इतरांना ते ग्रुप चालवता येत नाही आहेत. लीडर्स वेगळे झाल्याने इतर सदस्य एक झाले आहेत. भांडण करणाऱ्या निक्कीला परत ग्रुपमध्ये घ्यायचं नाही, असं त्यांनी ठरवलं आहे. A आणि B एकत्र झाले आहेत. तीन दिवसांत तूदेखील त्यांच्यात सहभागी होणार आहेस”.

निक्की क्वीन

UNSEEN UNDEKHA मध्ये निक्की अभिजीतला म्हणतेय, मी ट्रॉमा नसता तर खरचं मी कालचा टास्क खेळले असते. काल घरातील सर्व सदस्य माझ्यावर हसत होते आणि खिल्ली उडवत होते. आजही मला हे सर्व जखमी प्राणी-पक्षी दिसत आहेत. अभिजीतसोबत गेल्याने नॉमिनेट झाली, कॅप्टनसी गेली असं त्यांना वाटतं”. निक्की पुढे म्हणते,” मी अरबाजला म्हणाले तुला जर असं वाटत असेल ना की सेफ व्हायला मी तुझ्यासोबत राहावं तर मला तुझ्यासोबत राहुन खेळ खेळायचा नाही. मला चॅलेंजेंस हवेत. माझा कणा मोडला तरी ताठ मानेने परत उभी राहील. काल मी हरले तरी मी ताठ मानेने उभी होते. राणी कायमच राणी असते. मी राणीच्या पदाला खाली आणणार नाही. मी बिग बॉस मराठीच्या घराची राणी आहे हाच गेम आहे”. दुसरीकडे घरातील इतर सदस्य कालच्या टास्कबद्दल चर्चा करताना दिसणार आहेत.

Bigg Boss Marathi: फार हसू येतंय का? ‘बिग बॉस’ने घेतली डीपी अन् अंकिताची फिरकी

बिग बॉस’ने घेतली डीपी अन् अंकिताची फिरकी

‘बिग बॉस मराठी’च्या घरात सदस्यांचा कल्ला, राडा आणि गेम सुरूच आहे. या आठवड्यात जोडीचं बंधन या टास्कमुळे घरातील सदस्यांची नाती बदलली. त्यामुळे टीमदेखील बदलल्या. पहिले चार आठवडे घरातील सदस्य एका वेगळ्या टीममध्ये होते. पण पाचव्या आठवड्यात मात्र या टीम बदलल्या गेल्या. आजच्या भागात डीपी दादा आणि अंकिताची बिग बॉस फिरकी घेताना दिसणार आहेत.

‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य ‘बिग बॉस’ काय आदेश देणार हे जाणून घेण्यासाठी जमले आहेत. दरम्यान निक्कीला प्रचंड थंडी वाजते. त्यानंतर अभिजीत त्याचं जॅकेट निक्कीला देतो. त्यामुळे डीपी दादा आणि अंकिताला मात्र हसू येतं. त्यावर बिग बॉस म्हणतात,”धनंजय, अंकिता फार हसू येतंय… मलाही सांगा हा जोक”. त्यावर डीपी दादा म्हणतो,”बिग बॉस काही जोक नव्हता”. पुढे बिग बॉस म्हणतात,”मी सांगू का आपल्या मनात काय होतं…जाऊदे”.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube