Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात तुटलेली मनं परत जुळणार, न सांगितलेल्या गोष्टी बाहेर येणार!
Bigg Boss Marathi New Season Day 34: ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi ) घरातील निक्की (Nikki) आणि अरबाजची (Arbaaz) जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली. पण काही कारणाने आता त्यांच्यात दुरावा आला आहे. (Bigg Boss Marathi New Season) आजच्या भागात मात्र निक्की आणि अरबाज एकमेकांसोबत गप्पा मारताना दिसणार आहेत. समोर आलेल्या प्रोमोमध्ये निक्की अरबाजला म्हणतेय,”तुला जर कोणी व्यक्ती आवडत असेल तर त्याला रागाच्या भरात काहीही बोलू नकोस. शब्द जपून वापर. लोकांना सत्य दाखव”. त्यानंतर अरबाज निक्कीला मिठी मारताना दिसून येतो. त्यामुळे आता बिग बॉस मराठीच्या घरातील तुटलेली मनं पुन्हा जुळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
View this post on Instagram
अभिजीत गुरुंनी सांगितलेली ‘बिग बॉस मराठी’ची व्याख्या
‘बिग बॉस मराठी’ या खेळाची व्याख्या करणं खूप कठीण आहे. या खेळातील प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. आजच्या भागात अभिजीत निक्कीला सांगतोय,”बिग बॉस मोठा गेम आहे. संपूर्ण जगात एका माणसाचं पूर्ण जीवन, त्याची जगण्याची पद्धत या सगळ्या गोष्टींना तीन महिन्यांसाठी ब्रेक देण्याचं काम ‘बिग बॉस मराठी’ हा कार्यक्रम करतो. या तीन महिन्यात माणूस अडचणींमधून जातो. लोकांना फेस कसं करायचं हे बिग बॉस मराठीच्या माध्यमातून शिकता येतं. एखाद्या परिस्थितीतून कसं बाहेर पडायचं हे या खेळातून कळतं”. बिग बॉस मराठीचा सर्वत्र चांगलाच बोलबाला आहे.
आर्याने अरबाजला दिला निक्कीसोबत बोलण्याचा सल्ला
‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांमध्ये काही दिवसांपासून नाराजीचा सूर आहे. सदस्य एकमेकांवर नाराज आहेत. निक्की आणि अरबाजची पहिले चार आठवडे चांगली मैत्री पाहायला मिळाली. पण आता मात्र ते एकमेकांपासून दुरावले आहेत. आजच्या भागात आर्या अरबाजला निक्कीसोबत बोलण्याचा सल्ला देताना दिसून येणार आहे.
आजच्या भागात आर्या अरबाजला म्हणत आहे,”तू ज्या परिस्थितीत आहेस त्यातून मी गेली आहे. त्यामुळे मला तुला असं पाहावत नाही. तुला निक्कीसोबत बोलायचं असेल तर बोल..पण एक गोष्ट लक्षात ठेव तिने जर तुला दुखावलं तर.. तू तुझं सर्वोत्तम दे…तिच्यासोबत बोल… पण तरी पुन्हा ती असचं वागली तर परत तिच्याकडे जाऊ नको. कारण तू जेवढं तिला सांगशील एखादी गोष्ट न करण्यासाठी तेवढी ती जास्त करेल”.
Bigg Boss Marathi : अभिजीत गुरुंनी सांगितलेली ‘बिग बॉस मराठी’ची व्याख्या तुम्ही ऐकली का?
अरबाज पुढे आजच्या भागात निक्कीसोबत बोलताना दिसणार आहे. अराबाज निक्कीचं बोलणं जान्हवीला मात्र चांगलच खटकत आहे. त्यामुळे निक्की म्हणतेय,”मी तुझ्यासोबत बोललेलं तुझ्या बहिणीला आवडत नाही. चांगल्या टर्मवर आपण हे थांबवूयात. अनेक दिवस आपल्याला या घरात राहायचं आहे. सगळेच मला तुझ्यापासून दूर ठेवत असतील तर मलादेखील आता एक अंतर ठेवायचं आहे”.