Bigg Boss Marathi : अभिजीत गुरुंनी सांगितलेली ‘बिग बॉस मराठी’ची व्याख्या तुम्ही ऐकली का?

Bigg Boss Marathi : अभिजीत गुरुंनी सांगितलेली ‘बिग बॉस मराठी’ची व्याख्या तुम्ही ऐकली का?

Bigg Boss Marathi New Season Day 33 : ‘बिग बॉस मराठी’ या खेळाची (Bigg Boss Marathi New Season) व्याख्या करणं खूप कठीण आहे. या खेळातील प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. आजच्या भागात (Bigg Boss Marathi) अभिजीत (Abhijeet) निक्कीला (Nikki) ‘बिग बॉस मराठी’ची व्याख्या समजून सांगत असल्याचे पाहायला मिळाले आहे. “बिग बॉस मोठा गेम आहे. (Bigg Boss Marathi New Promo) संपूर्ण जगात एका माणसाचं पूर्ण जीवन, त्याची जगण्याची पद्धत या सगळ्या गोष्टींना तीन महिन्यांसाठी ब्रेक देण्याचं काम ‘बिग बॉस मराठी’ हा कार्यक्रम करतो. या तीन महिन्यात माणूस अडचणींमधून जातो. लोकांना फेस कसं करायचं हे बिग बॉस मराठीच्या माध्यमातून शिकता येतं. एखाद्या परिस्थितीतून कसं बाहेर पडायचं हे या खेळातून कळतं”. बिग बॉस मराठीचा सर्वत्र चांगलाच बोलबाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


आर्याने अरबाजला दिला निक्कीसोबत बोलण्याचा सल्ला

बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांमध्ये काही दिवसांपासून नाराजीचा सूर आहे. सदस्य एकमेकांवर नाराज आहेत. निक्की आणि अरबाजची पहिले चार आठवडे चांगली मैत्री पाहायला मिळाली. पण आता मात्र ते एकमेकांपासून दुरावले आहेत. आजच्या भागात आर्या अरबाजला निक्कीसोबत बोलण्याचा सल्ला देताना दिसून येणार आगे. आजच्या भागात आर्या अरबाजला म्हणत आहे,”तू ज्या परिस्थितीत आहेस त्यातून मी गेली आहे. त्यामुळे मला तुला असं पाहावत नाही. तुला निक्कीसोबत बोलायचं असेल तर बोल..पण एक गोष्ट लक्षात ठेव तिने जर तुला दुखावलं तर.. तू तुझं सर्वोत्तम दे…तिच्यासोबत बोल… पण तरी पुन्हा ती असचं वागली तर परत तिच्याकडे जाऊ नको. कारण तू जेवढं तिला सांगशील एखादी गोष्ट न करण्यासाठी तेवढी ती जास्त करेल”.

अरबाज पुढे आजच्या भागात निक्कीसोबत बोलताना दिसणार आहे. अराबाज निक्कीचं बोलणं जान्हवीला मात्र चांगलच खटकत आहे. त्यामुळे निक्की म्हणतेय,”मी तुझ्यासोबत बोललेलं तुझ्या बहिणीला आवडत नाही. चांगल्या टर्मवर आपण हे थांबवूयात. अनेक दिवस आपल्याला या घरात राहायचं आहे. सगळेच मला तुझ्यापासून दूर ठेवत असतील तर मलादेखील आता एक अंतर ठेवायचं आहे”.

Bigg Boss Marathi: पाताळलोकात खतरनाक गेम रंगणार, दुसऱ्याचा पाय खेचून कोण जिंकणार?

दुसऱ्याचा पाय खेचून कोण जिंकणार?

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये टीम A आणि टीम B मधील सदस्य पाताळलोकात सोन्याची नाणी शोधताना दिसत आहेत. सोन्याची नाणी शोधून सदस्यांना ती जपायचीदेखील आहे. त्यामुळे प्रोमोमध्ये सदस्य एकमेकांचे हातपाय खेचतानादेखील दिसत आहेत. सोन्याची नाणी शोधण्यासाठी ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांमध्ये चांगलीच चढाओढ होत असलेली पाहायला मिळणार आहे. सदस्यांचा हा टास्क पाहताना प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube