सरकारमधील मंत्रीच जातीयवादी विधान करत असेल तर… पवारांची शेलारांचं नाव न घेता टीका
Sharad Pawar यांनी मंत्री जर धार्मिक आणि जातीय तेढ वाढवत असेल तर ते राज्याच्या दृष्टीने हिताचं नाही. असं म्हणत शेलारांचं नाव न घेता टीका केली
Sharad Pawar Criticize Aashish Shelar for religious statement on Vote Chori : राज्यामध्ये एकीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू असताना दुसरीकडे विरोधकांकडून दुबार मतदार नोंदणी तसेच मत चोरीचा आरोप केला जात आहे या दरम्यानच भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी मतसुरीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांचा परदा फास्ट करत पत्रकार परिषद घेत दुबार मतदारांचे आकडेवारी सांगितले यामध्ये त्यांनी मुस्लिम मतदाराचा उल्लेख करत वोटची हातचा आरोप केला शरद पवार यांनी जातीयवाद निर्माण केला जात असल्याचे टीका नाव न घेता केले आहे.
काय म्हणाले शरद पवार?
त्यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, राज्यात सामाजिक ऐक्य राहील याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. विशेषता सरकारमध्ये जे आहेत. त्यांची जबाबदारी आहे की, राज्यातील सामाजिक ऐक्य टिकवून ठेवणे. मात्र सरकारमधील एक जेष्ठ मंत्री जर धार्मिक आणि जातीय तेढ वाढवणारे वक्तव्य करत असेल तर ते राज्याच्या दृष्टीने हिताचं नाही. असं म्हणत शरद पवार यांनी मंत्री आशिष शेलार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.
काय म्हणाले होते आशिष शेलार?
गळा मत चोरीचा अन् पुळका व्होट जिहादचा म्हणत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार (Aashish Shelar) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा पर्दाफाश केलायं. मतदार यादीतील दुबार मतदारांच्या नावांवरुन महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. त्यानंतर आज आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांच्या मतदारसंघातील दुबार मतदारांची आकडेवारीच सांगितलीयं.
निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा; वाचा,जिल्हा व विभागनिहाय संख्या
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला दोन लाखांपेक्षा कमी मतदान झालं. मात्र आम्ही मतदार याद्या पाहिल्या नाहीत. लोकसभा निवडणुकीत तुम्ही मतचोरी केली असं विचारु का? हा तुमचा घोटाळा आहे. मतदारसंघ , मतदारांची नावे राज ठाकरे यांनी हिंदू नाव काढलं. रोहित पवार यांच्या जामखेड मतदारसंघात, नाना पटोले यांच्या मतदारसंघात देखील दुबार मते आहेत, महाविकास आघाडी राजीनामा मागणार काय? असा थेट सवाल शेलार यांनी केलायं. तसेच यावेळी बोलताना शेलार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मतदारसंघातील दुबार मतदारांची आकडेवारीच सांगितलीयं.
