अनिल अंबानींना धक्का, तब्बल 7,500 कोटींची संपत्ती जप्त; नेमकं प्रकरण काय?

Anil Ambani :  रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड संबंधित बँक फसवणूक प्रकरणात ईडीने मोठी कारवाई करत अनिल अंबानींची तब्बल 7,500 कोटींची

  • Written By: Published:
Anil Ambani

Anil Ambani :  रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड संबंधित बँक फसवणूक प्रकरणात ईडीने मोठी कारवाई करत अनिल अंबानींची तब्बल 7,500 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. माहितीनुसार, या प्रकरणात कारवाई करत ईडीने नवी मुंबईतील धीरुभाई अंबानी नॉलेज सिटी परिसरातील 132 एकरपेक्षा जास्त जमीन जप्त केली आहे. ज्याची किंमत 4,462.81 कोटी रुपये आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), 2002 अंतर्गत या प्रकरणात ईडीकडून कारवाई  करण्यात येत आहे.

तर दुसरीकडे या प्रकरणात कारवाई  करत ईडीने (ED) यापूर्वी रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड (Reliance Communications Limited) , रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडशी संबंधित प्रकरणात कारवाई करत अनिल अंबानी (Anil Ambani) यांची 42 मालमत्ता जप्त केल्या होत्या. ज्यांची किंमत 3,083 कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. तर सोमवारी करण्यात आलेल्या या कारवाईनंतर आता रिलायन्स ग्रुपच्या बँक फसवणूक प्रकरणांमध्ये जप्त केलेल्या मालमत्तांचा एकूण आकडा आता 7,545 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

संपूर्ण प्रकरण काय?

या प्रकरणात ईडीने दिलेल्या माहितीनुसार,आरकॉम (RCom) आणि तिच्या सहयोगी कंपन्यांनी 2010 ते 2012 दरम्यान देशांतर्गत आणि विदेशी बँकांकडून 40,185 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. यापैकी पाच बँकांनी कर्जाचे खाते फ्रॉड म्हणून घोषित केले आहे. तर आता या प्रकरणात ईडीकडून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. ईडीच्या तपासात आणखी काही धक्कादायक खुलासे या प्रकरणात होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मोठी बातमी, आजपासून ‘या’ 12 राज्यांमध्ये सुरू होणार एसआयआर ; जाणून घ्या सर्वकाही

या प्रकरणात सीबीआयने आरकॉम, अनिल अंबानी आणि इतरांविरुद्ध वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने या प्रकरणात तपास सुरु केला आहे. तर दुसरीकडे ईडीने या प्रकरणात सोमवारी केलेल्या  कारवाईत अनिल अंबानी यांची दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, मुंबई, पुणे, ठाणे, हैदराबाद, चेन्नई, कांचीपुरम आणि ईस्ट गोदावरीमधील संपत्ती जप्त केली आहे.

follow us