अनिल अंबानींना धक्का, बँक ऑफ बडोदाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; अडचणी वाढणार

  • Written By: Published:
अनिल अंबानींना धक्का, बँक ऑफ बडोदाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; अडचणी वाढणार

Bank of Baroda Action On Anil Ambani : अनिल अंबानी पुन्हा एकदा देशाच्या राजकारणात चर्चेत आले आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड (आरकॉम) आणि आरकॉमचे माजी संचालक अनिल अंबानी यांना मोठा धक्का बसला आहे. बँक ऑफ बडोदाने भारतीय शेअर बाजारात माहिती देत आरकॉमची कर्ज खाती फसवणूक श्रेणीत टाकली असल्याची माहिती दिली आहे. बँक ऑफ बडोदाने घेतलेल्या या निर्णयानंतर अनिल अंबानींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) दिलेल्या माहितीनुसार, बँकेचा हा निर्णय त्या कर्जांशी संबंधित आहे जे कंपनी कॉर्पोरेट दिवाळखोरी निराकरण प्रक्रिया (CIRP) मध्ये जाण्यापूर्वी घेतले गेले होते. तर दुसरीकडे या प्रकरणात प्रतिक्रिया देत ही सर्व कर्जे दिवाळखोरी प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीची आहेत आणि आता ती रिझोल्यूशन प्लॅन अंतर्गत किंवा इतर कोणत्याही प्रकारे निकाली काढली पाहिजेत. कंपनी सध्या रिझोल्यूशन प्रोफेशनल अनिश निरंजन नानावटी यांच्या व्यवस्थापनाखाली आहे. अनिल अंबानी (Anil Ambani) आता कंपनीच्या संचालक मंडळात समाविष्ट नाहीत असं आरकॉमने स्पष्ट केले आहे.

कंपनीने म्हटले आहे की रिझोल्यूशन प्लॅनला क्रेडिटर्स कमिटी (CoC) ने मान्यता दिली आहे आणि आता ती राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (NCLT) च्या मंजुरीची वाट पाहत आहे. तर या प्रकरणात अनिल अंबानींच्या प्रवक्त्यांनी देखील प्रतिक्रिया देत रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड (RCom) आणि अंबानी यांच्या कर्ज खात्याचे वर्गीकरण करण्याची बँक ऑफ बडोदाने केलेली कारवाई 12 वर्षांहून अधिक जुन्या (2013 शी संबंधित) प्रकरणाशी संबंधित आहे. 2006 ते 2019 पर्यंत अंबानी हे केवळ गैर-कार्यकारी संचालक होते आणि कंपनीच्या दैनंदिन कामकाजात किंवा निर्णयांमध्ये त्यांची कोणतीही भूमिका नव्हती असं म्हटले आहे.

फसवणुकीची रक्कम 17,000 कोटी रुपये?

आरकॉमकडे 14 बँकांचा संघ होता, परंतु 10 वर्षांनंतर, निवडक कर्जदार आता कारवाई करत आहेत. सध्या, कंपनीचे व्यवस्थापन एसबीआयच्या नेतृत्वाखालील कर्जदाता समिती आणि एका रिझोल्यूशन प्रोफेशनलच्या देखरेखीखाली आहे. मार्च 2020 मध्ये, कर्जदाता समितीने रिझोल्यूशन प्लॅनला मंजुरी दिली, परंतु हे प्रकरण अजूनही एनसीएलटी, सर्वोच्च न्यायालय आणि इतर न्यायालयीन मंचांमध्ये प्रलंबित आहे. अंबानी यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत आणि कायदेशीर सल्ल्यानुसार ते योग्य पावले उचलतील असे म्हटले आहे.

उत्तर भारतात मुसळधार पावसाचा कहर! दिल्ली, पंजाब, जम्मूमध्ये पूरस्थिती; यमुना नदी धोक्याच्या पातळीवर

अनिल अंबानी समूहाच्या कंपन्यांशी संबंधित कथित कर्ज घोटाळ्याची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चौकशी करत असताना ही घटना उघडकीस आली आहे. असे सांगितले जात आहे की ईडीने 12-13 बँकांकडून रिलायन्स हाऊसिंग फायनान्स, आरकॉम आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्सशी संबंधित कर्जांची माहिती मागवली आहे. या कथित फसवणुकीची एकूण रक्कम सुमारे 17, 000 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube