ईडीनंतर सीबीआयचा दणका! अनिल अंबानींशी संबंधित सहा ठिकाणी CBI चा छापा; काय मिळालं?

Anil Ambani News : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या (Anil Ambani) अडचणी काही केल्या कमी होत नाहीत. मुंबईमधील RCOM आणि अनिल अंबानी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर आज सीबीआयने छापे टाकले. याआधी ईडीने देखील अनिल अंबानी यांच्यावर छापेमारी केली होती. तसेच त्यांना समन्स बजावून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. 13 जून 2025 रोजी एसबीआय ने अनिल अंबानी यांच्या अकाउंटला फ्रॉड म्हणून घोषित केले होते.
याआधी ईडीने काही दिवसांपूर्वी अनिल अंबानी समुहाच्या कंपन्यांच्या विरोधात कोट्यावधींच्या कर्जाच्या हेराफेरीशी संबंधित मनीलाँड्रिंग प्रकरणांत चौकशी केली होती. या कारवाईला काही दिवस लोटल्यानंतर आज थेट सीबीआयने छापे टाकले आहेत. या कारवाईने उद्योग जगतात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सीबीआयने अनिल अंबानी यांच्याशी संबंधित सहा ठिकाणांवर छापे टाकले आहेत.
अनिल अंबानी आणखी गोत्यात! 3 हजार कोटींच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी लूकआउट नोटीस जारी
सूत्रांकडील माहितीनुसार, सीबीआयने कंपनीच्या विरोधात बँक फ्रॉडचा खटला दाखल केला आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाला (State Bank of India) दोन हजार कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. सीबीआयची पथके आज मुंबईतील काही ठिकाणी छापे टाकले. हे सर्च ऑपरेशन RCOM आणि अनिल अंबानी यांच्याशी संबंधित ठिकाणी सुरू होते.
एसबीआयने 13 जून 2025 रोजी या प्रकरणाला फ्रॉड या कॅटेगरीत ठेवले होते. हा निर्णय रिजर्व बँकेच्या गाइडलाइन्स आणि बँकेच्या बोर्ड स्वीकृत धोरणानुसार घेण्यात आला होता. यानंतर 24 जून 2025 रोजी बँकेने याबाबत रिजर्व बँकेला माहिती दिली होती. यानंतर तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. या संपूर्ण प्रकरणात अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी मागील महिन्यात लोकसभेत लेखी उत्तरात माहिती दिली होती. बँकेने अहवाल रिजर्व बँकेला पाठवून दिला आहे आणि आता सीबीआयकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सीबीआयने सुद्धा तक्रार दाखल करून घेत पुढील कार्यवाहीला सुरुवात केली आहे अशी माहिती मंत्री चौधरी यांनी दिली होती.
मोठी बातमी! अनिल अंबानींविरुद्ध ED ची कारवाई; तब्बल 50 ठिकाणी टाकले छापे
दरम्यान, अनिल अंबानी यांच्याशी संबंधित 48 ते 50 लोकेशन्सवर ईडीची शोधमोहिम सुरू आहे. सीबीआयने दोन एफआयआर दाखल केल्यानंतर मागील महिन्यात ईडीकडून कारवाई करण्यात आली होती. या कंपन्यांनी बँकांकडून कर्ज घेऊन पैशांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला. हा पैसा अन्य कंपन्यांत वळवण्यात आला. यामुळे सर्वसामान्य नागरिक, गुंतवणूक आणि सरकारी संस्थांची फसवणूक केली. काही मोठ्या संस्थांनीही माहिती ईडीला दिली. यामध्ये नॅशनल हाउसिंग बँक (NHB) सेबी आणि नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी (NFRA) आणि बँक ऑफ बडोदा सहभागी आहेत.