शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदही राजकीय आखाड्यात? बिहार निवडणुकीत उमेदवार उभे करणार

ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे.

Bihar Assembly Elections

Bihar Assembly Elections 2025 : बिहारमध्ये निवडणुकीचे वारे आता जोरात वाहू लागले आहेत. या निवडणुकीच्या धामधुमीत एक मोठी बातमी समोर आली आहे. आपल्या वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारे ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सध्या बिहार राज्याच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी ते सीतामढी येथे पोहोचले.

शंकराचार्यांचे राष्ट्रीय मीडिया प्रभारी शैलेंद्र योगीराज सरकार (Bihar Assembly Elections 2025) यांनी एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. यात म्हटले आहे की स्वामीजी गोवंश आणि गोमातेच्या संरक्षणासाठी अभियान चालवत आहेत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी निश्चित केले आहे की या मुद्द्याला निवडणुकीशी जोडून एक चांगले जनमत तयार केले जाईल. जेणेकरून गोहत्या संपूर्ण भारतात प्रतिबंधित केली जाईल.

नेपाळसह भारतात राजेशाही लागू करा; शं‍कराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मागणी 

या मुद्द्यावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी निवडणुकीत 243 जागांवर उमेदवार देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या अनुषंगाने लवकरच बिहारमध्ये गोरक्षा संकल्प यात्रा सुरू करण्यात येणार आहे. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी जाहीर केले की बिहार विधानसभा निवडणुकीत गोहत्ये विरोधात काम करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या अपक्ष उमेदवारांनाही पाठिंबा देऊ. हिंदुस्तान टाइम्सने याबाबतीत वृत्त दिले आहे.

मागील सत्तर वर्षे आणि अनेक आश्वासने दिल्यानंतरही कोणत्याही पक्षाने गोहत्येविरुद्ध कारवाई करण्याचं वचन दिलेलं नाही. बिहारच्या निवडणुकीत आम्ही गोरक्षण आणि सनातन धर्मासाठी मतदान करणार आहोत. तसेच बिहार विधानसभा निवडणुकीत आम्ही अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देऊ. या निवडणुकीत 243 मतदारसंघात उमेदवार उभे करू पण हे उमेदवार कोण असतील त्यांची नावं आताच उघड करणार नाही, असे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी सांगितले.

खळबळजनक ! राहुल गांधी हिंदू धर्मातून बहिष्कृत, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा मोठा निर्णय

follow us
  • fb
  • instagram
  • youtube