Bihar Election 2025 : निवडणुकीसाठी AIMIM तयार; 25 उमेदवारांची यादी जाहीर
Bihar Election 2025 : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभा निवणुकीसाठी एआयएमआयएमने 25 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

Bihar Election 2025 : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभा निवणुकीसाठी एआयएमआयएमने 25 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या निवडणुकीत खासदार ओवैसी यांचा पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याने एमआयएम किती जागांवर जिंकणार सध्या याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएमकडून (AIMIM) 25 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून या यादीत पक्षाने दोन हिंदू उमेदवारांना देखील संधी दिली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएमने (Asaduddin Owaisi) मोठी घोषणा करत सिवान, गोपाळगंज, किशनगंज आणि मधुबनी येथून आपले उमेदवार दिले आहे. तसेच एआयएमआयएमने दोन हिंदूंनाही तिकिटे दिली आहेत. राणा रणजीत सिंह यांना ढाक्यातून आणि मनोज कुमार दास यांना सिकंदरा येथून उमेदवारी देण्यात आली आहे.
पूर्व चंपारणमधील राणा रणजित सिंह (Rana Ranjit Singh) यांची ढाका जागा देखील चर्चेचा केंद्रबिंदू आहे. रणजित सिंह यांचे वडील माजी खासदार सीताराम होते आणि ते माजी भाजप (BJP) मंत्री रणधीर सिंह यांचे भाऊ आहेत. रणजित सिंह मुस्लिम टोपी, कपाळावर टिळक आणि हातात पवित्र धागा घालून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. रणजित सिंह यांना ज्या जागेवरून उमेदवारी देण्यात आली आहे ती जागा मुस्लिम बहुल आहे.
बिहार विधानसभा चुनाव के AIMIM प्रत्याशियों के नाम कुछ इस तरह हैं। इंशाअल्लाह उम्मीद है कि हम बिहार के सबसे मज़लूम लोगों की आवाज़ बनेंगे। यह सूची AIMIM बिहार यूनिट ने तैयार की है और इस सिलसिले में पार्टी की क़ौमी कियादत से भी मशविरा किया गया है।
We are happy to announce the list… pic.twitter.com/9ec1t4KpR2
— AIMIM (@aimim_national) October 19, 2025
बिहार निवडणुका कधी आहेत?
बिहारमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिला टप्पा 6 नोव्हेंबर रोजी होणार आहे, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे. निकाल 14 नोव्हेंबर रोजी जाहीर होतील.
7000mAh बॅटरी अन् दमदार फीचर्ससह खरेदी करा ‘हा’ भन्नाट फोन; खर्च होणार फक्त 679 रुपये