पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी अंबानी सरसावले; केली मोफत उपचारांची घोषणा

  • Written By: Published:
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी अंबानी सरसावले; केली मोफत उपचारांची घोषणा

Pahalgham Terror Attack Reliance Foundation offer free treatment to all the injured : एकीकडे जम्मू-काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. याच जखमींसाठी रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) पुढे आले असून, त्यांनी पहलगाम येथील हल्ल्यात जखमी झालेल्यांसाठी मोफत उपचारांची घोषणा केली आहे.

ब्रेकिंग : पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द; पुढील तीन दिवसांत सोडावा लागणार भारत देश

अंबानींनी जारी केलेलं निवेदन काय? 

पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल रिलायन्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, “२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीयांच्या मृत्यूबद्दल रिलायन्स कुटुंबाकडून शोक व्यक्त केला. तसेच हल्ल्यात जखमी झालेल्यांना लवकर आराम मिळावा अशी प्रार्थना करतो.

सर्व जखमींवर मोफत उपचार

पुढे मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे की, मुंबईतील रिलायन्स फाउंडेशन सर एचएन हॉस्पिटलमध्ये सर्व जखमींवर मोफत उपचार केले जातील असे नमुद केले आहे. तसेच दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे. त्याचे कोणीही कोणत्याही प्रकारे समर्थन करू नये. दहशतवादाविरोधाच्या निर्णायक लढाईत आम्ही पंतप्रधान, भारत सरकार आणि संपूर्ण देशासोबत खंबीरपणे उभे असल्याचे अंबानी यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर 

पहलगाममध्ये मंगळवारी (दि. २२ ) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला, ज्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये महाराष्ट्राताली सहा नागरिकांचा मृत्यू झाला असून, या मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तर, जम्मू-काश्मीर सरकारकडूनदेखील घटनेतील सर्व 26 मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

‘दहशतवाद्यांना’ पोसण्यासाठी पाकिस्तान किती खर्च करतो? आकडे वाचून पायाखालची जमीन सरकेल

पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई करण्यास सुरूवात केली असून, याचाच एक भाग म्हणून आता  पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानी नागरिकांना पुढील ३ दिवसांत भारत सोडण्याचे आदेश देत या नागरिकांचे व्हिजा केवळ २७ एप्रिलपर्यंत वैध असतील. याशिवाय पाकिस्तानी नागरिकांचा वैद्यकीय व्हिसा २९ एप्रिलपर्यंत वैध असेल असे भारत सरकारने स्पष्ट केले आहे.

Pahalgam Terror Attack : भारताचा पाकिस्तानवर ‘डिजिटल स्ट्राईक’, अधिकृत X अकाउंट केले बॅन

पहलगाम हल्ल्यावर मोदींचा थेट इशारा
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी (Pahalgham Attack) निष्पाप नागरिकांना ज्या क्रूरतेने मारले त्याबद्दल संपूर्ण देश दुःखी आहे. संपूर्ण राष्ट्र सर्व पीडित कुटुंबांच्या दुःखात त्यांच्यासोबत असून आता दहशतवाद्यांची जी काही थोडीफार जमीन उरली आहे ती नष्ट करण्याची वेळ आली असल्याचे म्हणत त्यांना ‘मिट्टी में मिलाने का वक्त आ गया है’ असा थेट इशारा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube