वनविभागाची मोठी कारवाई; पिंपरखेड परिसरात नर बिबट्या ठार

Pune News  : गेल्या काही महिन्यांपासून पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर आणि जुन्नर परिसरात बिबट्यांची दहशत पाहायला मिळत होती.

  • Written By: Published:
Pune News 

Pune News  : गेल्या काही महिन्यांपासून पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर आणि जुन्नर परिसरात बिबट्यांची दहशत पाहायला मिळत होती. या परिसरात बिबट्याचे हल्ले वाढत असल्याने नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती मात्र आता पिंपरखेड ( (ता. शिरूर) परिसरात वनविभागाने मोठी कारवाई करत नर बिबट्याला गोळी घालून ठार केले. वनविभागाच्या या कारवाईनंतर नागरिकांनी आता सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

या परिसरात गेल्या दीड महिन्यांत बिबट्यांच्या (leopard) हल्ल्यांमध्ये चार निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे बिबट्यावर ठोस कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून वारंवार करण्यात येत होती. तर दुसरीकडे राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी या प्रकरणात केलेल्या विनंतीनंतर राज्य सरकारकडून बिबट्याला ठार मारण्याची परवानगी देण्यात आली होती.

बिबट्याला ठार मारण्याची परवानगी मिळाल्यानंतर वनविभागाने विशेष पथक तयार करुन बिबट्याला ठार मारण्याची मोहीम राबवली आणि 4 नोव्हेंबर रोजी पिंपरखेड परिसरात असणाऱ्या नर बिबट्याला ठार मारले. विनविभागाने वळसे पाटील यांच्या आंबेगाव- शिरुर मतदारसंघात ही मोठी कारवाई केली असून गेल्या दहा वर्षात प्रथमच वनविभागाने अशी कारवाई करत बिबट्याला ठार मारले. वनविभागाच्या या मोहिमेत वनविभागाच्या या मोहिमेत स्थानिक पथकासोबत तज्ज्ञ शूटरचाही सहभाग होता.

तर दुसरीकडे वनविभागाने गेल्या दहा दिवसांत दहा बिबट्यांना जेरबंद केलेल्याने आता नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. बिबट्याला ठार मारल्यानंतर वनविभागाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुढील अहवाल सादर केला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी वनअधिकाऱ्यांचे आभार मानत या कारवाईचे स्वागत केले आहे.

या संदर्भात उपवनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस म्हणाल्या, “गेल्या काही दिवसांपासून वनविभागाचे कर्मचारी सतत भीतीच्या वातावरणात काम करत आहेत. मात्र, त्यांनी मोठ्या हिमतीने मोहिम पार पाडली. नागरिकांचा जीवितहानीचा धोका टळावा यासाठी पुढील काही दिवस विभाग परिसरात गस्त आणि शोधमोहीम सुरू ठेवणार आहे.”

गेल्या 23 वर्षांमध्ये दोन वेळा परवानग्या : माजी मंत्री दिलीप वळसे पाटील

4 नोव्हेंबर 2025 रोजी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पिंपरखेड येथील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात यश मिळालं आहे. गेल्या 23 वर्षांमध्ये दोन वेळा परवानग्या मिळूनही नरभक्षक बिबट्याला मारण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश मिळालं नव्हतं, पण आज प्रथमच हे यश मिळताना पाहून समाधान वाटतंय.

उत्पन्न वाढणार अन् मिळणार नोकरीत यश; जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल?

या कामगिरीबद्दल वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो. गेल्या काही दिवसात या बिबट्यामुळे आपण आपल्या जिवाभावाची जी माणसं गमावली त्यांच्याप्रति संवेदना व्यक्त करतो

follow us