मतदारसंघामध्येच रोजगार उपलब्ध झाल्याने मुंबई-पुण्याला जाणारे लोंढे थांबले ; दिलीप वळसे पाटील
Mahayuti Candidate Dilip Walse Patil Kopra Sabha : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांची प्रचाराच्या निमित्ताने कोपरा सभा झाली. यावेळी दिलीप वळसे पाटील म्हणाले की, आंबेगाव तालुक्यामध्ये उत्तम रस्त्यांचं विस्तृत जाळं निर्माण केलंय. मागील 35 वर्षांच्या कार्यकाळामध्ये (Assembly Election 2024) आपण केवळ आणि केवळ विकासाला महत्त्व दिलंय, ते आपल्या सर्वांना माहीत आहे, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत.
आज तालुक्यात शिक्षणसंस्थांचं मोठं जाळं निर्माण झालंय. तसेच रस्त्यांचं देखील विस्तृत जाळं मतदारसंघामध्ये निर्माण झालंय. वाहतुकीची समस्या देखील सुटली असल्याचं दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत. आंबेगाव तालुक्यामध्ये आपण पाण्याचं योग्य नियोजन केलंय. तालुक्यातील बहुतांशी भाग बागायती झाल्याचं प्रतिपादन देखील त्यांनी केलंय. मतदारसंघामध्येच रोजगार उपलब्ध होऊन रोजगारासाठी मुंबई-पुण्याला जाणारे लोंढे थांबले, असे भरसभेत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत.
Dilip Walse Patil : आमदारांच्या हालचाली जाणवतात… लवकरच सरकार कोसळणार ?
शिंदेवाडी येथे आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील त्यांच्या प्रचारार्थ कोपरा सभा झाली. यावेळी याप्रसंगी पक्षाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, माजी सभापती कैलासबुवा काळे, राजाभाऊ काळे, बाजार समितीचे संचालक निलेश थोरात, संतोष सैद, बंटी काळे, कपिल काळे, माऊली काळे, संजय शिंदे, सरपंच सारिका संजय शिंदे, मंदा बिडकर, किसन काळे, रोहन पोखरकर, स्वप्निल शिंदे, शंकर काळे, शंकर शिंदे हे कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडून येताच बैलगाडा शर्यतीच्या घाटाचे काम मार्गी लावणार; वळसे पाटलांची मोठी ग्वाही
वळसे पाटील म्हणाले की, शिंदेवाडीचं रूप आता बदलत चाललंय. हे आपण केलेल्या पाण्याच्या नियोजनामुळे शक्य झालंय. तालुक्यामध्ये आपण भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, शरद बँक, खरेदी-विक्री संघ, मंचर बाजार समिती या संस्थांमध्ये आज अनेकांना रोजगार उपलब्ध झालाय. यापुढील काळामध्ये देखील आपणाला अजून विकासकामे करायची आहेत. यासाठी मला आपण काम करण्याची पुन्हा संधी द्यावी, असं आवाहन भर सभेमध्ये वळसे पाटलांनी केलंय. यावेळी माऊली काळे, किरण घोडेकर, सरपंच सारिका शिंदे यांनी मनोगत व्यक्त केलंय.