Chandrayaan 3 : चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगसाठी 23 ऑगस्टचं का?
Chandrayaan 3 Moon Landing : भारताचे चांद्रयान 3 चंद्रावर उतरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असून, संपूर्ण जगाच्या नजरा या मोहिमेकडे लागलेल्या आहेत. जर, चांद्रयानने यशस्वीपणे चंद्रावर लँडिंग केले तर, इतिहासात 23 ऑगस्ट ही तारीखेची विशेष नोंद केली जाईल. पण, ज्यावेळी चांद्रायानचे लँडिंग होईल त्यावेळी भारतात संध्याकाळ होण्यास सुरूवात झालेली असेल. अशा परिस्थितीत याचे अंधारात लँडिंग होणार का? असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला असून, इस्त्रोने चंद्रावर उतरण्यासाठी 23 ऑगस्ट हीच तारीख का निवडली या मागचे नेमके गणित काय? याचे उत्तर आपण जाऊन घेऊया. (Why ISRO Choose 23 August Day For Soft Landing )
मंत्री छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी! वादग्रस्त विधानानंतर धमकीचा फोन…
चंद्रावरील एक दिवस 708 तासांचा असतो
चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार असून, सध्या तिथे अंधार आहे. 23 ऑगस्टला तेथे सूर्य उगवेल. ज्यावेळी सूर्य उगवेल त्याचवेळी चांद्रयानचे सॉफ्ट लँडिंगचे टायमिंग सेट करण्यात आले आहे. पृथ्वीप्रमाणेच चंद्रावरचा एक दिवस 24 तासांचा नव्हे तर, 708.7 तासांचा असतो. तर, चंद्राचा एक दिवस पृथ्वीच्या 29 दिवसांच्या बरोबरीचा असतो.
चंद्राचा एक दिवस पृथ्वीच्या 14 दिवसांच्या बरोबरीचा असतो आणि एक रात्र तेवढ्याच कालावधीची असते. 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर दिवस उगवण्यास सुरूवात होईल. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये आणि चंद्राचे चांगले फोटो घेता यावे यासाठी चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगसाठी 23 ऑगस्ट हा दिवस निश्चित करण्यात आला आहे.
‘स्वागत आहे भावा!’ चंद्राजवळच ‘चंद्रयान 3’ ला भेटलं ‘चंद्रयान 2’
प्रोपल्शन लँडर आणि लँडर मॉड्यूल हे चांद्रयानचे मुख्य भाग आहेत. लँडर मॉड्यूलमध्ये लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान आहे. रोव्हर प्रज्ञान लँडर विक्रममध्ये बसून चंद्राभोवती फिरत आहे. 17 ऑगस्ट रोजी प्रोपल्शन लँडरपासून वेगळे झाल्यानंतर, लँडर विक्रम एकटेच चंद्राकडे जात आहे.
23 ऑगस्ट रोजी जसे लँडर विक्रम चंद्रावर उतरले त्यानंतर त्यातील रोव्हर प्रज्ञान चंद्रावरील मातीचे नमुने गोळा करेल. रोव्हरला प्रकाशात अचूक काम करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून २३ ऑगस्टचा दिवस निवडण्यात आला. तसेच चांद्रयानाला दिवसा काम करण्यासाठी आवश्यक ऊर्जाही मिळेल अशी भूमिका 23 ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यामागे आहे.
शेवटची 20 मिनिटे…
ज्यावेळी चांद्रायान शेवटच्या टप्पात असेल म्हणजे शेवटच्या 20 मिनिटांत इस्रोकडून विक्रम लँडरला कोणतीही ऑर्डर दिली जाणार नाही. म्हणजे या काळात विक्रम लँडर स्वतःचं निर्णय घेईल. याचाच अर्थ शेवटच्या 20 मिनिटांमध्ये विक्रम लँडर स्वतःहून लँडिंगचे ठिकाण शोधेल आणि योग्य जागा मिळताच ते लँड करले.
चांद्रयान-3 च्या कॅमेऱ्याने टिपले चंद्राचे अदभूत फोटो, इस्रोने शेअर केला व्हिडिओ
विक्रम लँडरमध्ये कॅमेरे आणि सेन्सर्स बसवण्यात आलेले असून, याच्याच मदतीने ते लँडिंगसाठी योग्य जागा शोधेल जेव्हा शेवटच्या 10 मीटरमध्ये सर्व थ्रस्टर थांबतील आणि विक्रम लँडर सॉफ्ट लँडिंग करेल. सॉफ्ट लँडिंग झाल्यावर विक्रम लँडर काही काळ स्थिर राहील आणि आजूबाजूला उडणारी धूळ स्थिर होण्याची प्रतीक्षा करेल. सर्व काही व्यवस्थित झाल्यानंतर विक्रम लँडर ओपन होईल आणि त्यातून प्रज्ञान रोव्हर चंद्रावर उतरण्यास सुरूवात करेल.