भाजपच्या नादाला लागून निवडणूक आयोगाने देशभर… बाळासाहेब थोरातांचा निशाणा

भाजपच्या नादाला लागून निवडणूक आयोगाने देशभर… बाळासाहेब थोरातांचा निशाणा

Balasaheb Thorat on BJP and ECI for Vote Theft Aligations like Rahul Gnadhi in Shirdi Constituancy : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी लेट्सअप मराठीच्या लेट्सअप सभा या मुलाखत सदरामध्ये मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली. त्यामध्ये त्यांना राहुल गांधींनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांवर बोलताना त्यांनी शिर्डी मतदारसंघात अशी चोरी झाल्याचा आरोप आपण निवडणुकांच्या आधीच केल्याचं सांगितलं. तसेच भाजपच्या नादाला लागून निवडणूक आयोगाने देशभर काय-काय केलं. हे राहुल गांधी यांनी समोर आणल्याचं म्हटलं आहे.

काय म्हणाले बाळाबाहेब थोरात?

मी मत चोरीच्याबाबतीत मी तक्रार केलेल्या शिर्डी मतदारसंघाबाबत बोललेलचं चांगलं राहिलं. तिथे आम्ही उमेदवार दिला होता. यावेळी एक महिना अगोदर या मतदारसंघात मतदार वाढत होते. तेथे बाहेरील मतदारांची नोंदणी होत होती. ही वाढ नैसर्गिक नव्हती ती कृत्रिम होती. हे आम्ही जिल्हाधिकारी, केंद्र आणि राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिलं होतं. हा आकडा छोटा नव्हता. यामध्ये एक होस्टेलमधील अनेक नावं आली.

VIDEO : कृषीमंत्र्यांना बागायती गावाचीच पाटीलकी हवी! माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा सत्ताधाऱ्यांना टोला

या मतदारसंघाप्रमाणे अनेक ठिकाणी अशी वाढ पाहायला मिळाली. त्यातून सत्ताधाऱ्यांनी विजयी होण्याचा प्रयत्न केला. हे केवळ माझ्या मतदारसंघा पूरतं नाही तर देशभरात घडत आहे. मी मत चोरीच्याबाबतीत मी तक्रार केलेल्या शिर्डी मतदारसंघाबाबत प्रशासनाने काहीही उत्तर देखील दिलं नाही. तसेच मतदानाच्या आदल्या दिवशीपर्यंत मतदारांना ओळखपत्र वाटली गेली. तसेच ऑनलाईन नोंदणीच्यामाध्यमातून अनेक गैरप्रकार केले गेले. त्यामुळे आपल्या मतदारांमध्ये ट्रम्प यांचं नावं आलं तरी वावगं वाटू नये. यासाठी काही यंत्रणा काम करत आहेत. असा आरोप मतचोरीच्या आरोपांवरून बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

251 खासदारांचे सदस्यत्व धोक्यात, नव्या विधेयकामुळे कोणत्या पक्षाला सर्वाधिक धोका ?

तसेच निवडणूक आयोगाने राहुल गांधींना सॉफ्टकॉपीमध्ये मतदार याद्यांचा डेटा द्यायचा तर तो भल्या मोठ्या कागदांच्या गठ्ठ्यांमध्ये दिला. जेणे करून तो टॅलि केला जाऊ नये पण राहुल गांधी त्याला घाबरले नाही. त्यांनी त्याचं विश्लेषण केलं आणि भाजपच्या नादाला लागून निवडणूक आयोगाने किती मोठा घोटाळा केला याचं सत्य जनतेसमोर आणलं. यासाठी त्यांचं कौतुक झालं पाहिजे. असंही थोरात म्हणाले.

महाराष्ट्रात मतदार यादीत महा घोटाळा?

लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी 7 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर (Election Commission) गंभीर आरोप करत कर्नाटका लोकसभा (Karnataka Lok Sabha Election) आणि हरियाणा (Haryana) आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election) घोटाळा झाला असल्याचा आरोप केला होता. यामध्ये त्यांनी निवडणूक आयोगावर नवीन बॉम्ब टाकला. महाराष्ट्रात 40 लाख संशयित मतदार असल्याचा दावा या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube