मंत्री छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी! वादग्रस्त विधानानंतर धमकीचा फोन…

मंत्री छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी! वादग्रस्त विधानानंतर धमकीचा फोन…

Chagan Bhujbal : ब्राह्मण समाजाबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर आता मंत्री छगन भुजबळ यांना धमकीचा फोन आल्याचं समोर आलं आहे. अज्ञात इसमाकडून भुजबळ यांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात भुजबळांनी नाशिक पोलिस आयुक्तांकडे माहिती दिली असून पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.

Uddhav Thackery : वॉशिंग मशीन ऐवजी लढवय्यांच्या सेनेत आलात; ठाकरेंकडून धारकरांचं स्वागत अन् भाजपला टोला

काही दिवसांपासून छगन भुजबळ वादग्रस्त विधानामुळे चांगलेच चर्चेत आले आहे. ब्राम्हण समाजाबद्दल आणि देवी देवतांबद्दल भुजबळांनी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप ब्राम्हण समाजाकडून करण्यात आला आहे. त्यांच्या विधानंतर अनेक संघटनांकडून त्यांचा निषेधही करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. एवढचं नाहीतर परशुराम सेवा संघाच्यावतीने भुजबळांच्या कानाखाली मारणाऱ्याला एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं.

Ahmednagar News : ‘सेल्फी’ काढायला गेला अन् जीवच गमावला… रंधा फॉलमध्ये पडून तरुणाचा मृत्यू

काय म्हणाले होते भुजबळ?
ब्राह्मण समाजाने वाईट वाटून घेऊ नये. पण, ब्राह्मण समाजातील लोक त्यांच्या मुलांची संभाजी आणि शिवाजी अशी नावं ठेवत नाहीत. काही लोकांना सरस्वती तर काही लोकांना शारदा आवडते. परंतू महात्मा ज्योतिबा फुले, सावित्राबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांनी आमच्यासाठी शिक्षणाची दारं खुली केली. आम्ही कुठेही गेलो तरी, छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आणि आंबेडकर यांचा वारसा सोडणार नाही.

Box Office Collection: मायबाप प्रेक्षकांचे प्रेम पाहून थलायवा, सनी पाजी अन् अभिषेक बच्चन भारावले!

भुजबळांच्या कानाखाली देणाऱ्याला लाखाचं बक्षीस :
भुजबळांच्या वादग्रस्त विधानानंतर परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी थेट भुजबळांना आव्हान दिले होते. ते म्हणाले की, जो तरुण छगन भुजबळ यांच्या कानाखाली मारेल, त्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देऊ, अशी घोषणा त्यांनी केली होती.

दरम्यान, आता भुजबळांना जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आला आहे. त्यामुळे यासंदर्भातील माहिती नाशिक पोलिसांना देण्यात आली आहे. ज्या नंबरवरून फोन आला. त्या फोन नंबरवरून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube