Uddhav Thackery : वॉशिंग मशीन ऐवजी लढवय्यांच्या सेनेत आलात; ठाकरेंकडून धारकरांचं स्वागत अन् भाजपला टोला
Uddhav Thackery : पेणचे माजी नगराध्यक्ष आणि पेण अर्बन बॅंक घोटाळ्यातील आरोपी शशिर धारकर यांनी आज सोमवारी शिवसेनेच्या ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. यावेळी ठाकरे गटाचे नेते अनंत गीते आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेशपार पडला. धारकर यांच्यासोबत हजारो कार्यकर्त्यांनी देखील यावेळी पक्ष प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी कर्यकर्त्यांशी संवाद साधला.
दिलीप वळसे पाटलांच्या टीकेवर रोहित पवारांचा पलटवार! म्हणाले, जवळच्या लोकांनी..,
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
सर्व शिवसैनिकांचं मी स्वागत करतो. तुम्ही आता लढवयांच्या सेनेत प्रवेश केला आहात. काहीजण बघितले आव मोठा आणतात डोळे वटारले की पळून गेले. पण तुम्ही पळकुठे नाहीत याचा मला अभिमान आहे. शेवटी अन्यायावर वार करणं आपली ख्याती आहे. अन्याय सहन करायचा नाही. ही शिवसेनेची ओळख आहे. तसं पाहायचं तर तुम्हाला सोपा मार्ग होता वॉशिंग मशीन मध्ये जाऊ शकला असता. पण कर नाही त्याला डर कशाला. वॉशिंग मशीनमध्ये जायच्या ऐवजी लढवयांच्या सेनेत आलात. असं म्हणत यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला देखील लगावला.
शरद पवारांबद्दलचे ‘ते’ मत खरेच! वळसे पाटलांच्या दाव्याला अजितदादांचा पूर्ण पाठिंबा
त्यामुळे आता केवळ पेणच नाही तर संपूर्ण चांदा ते बांदा आपल्याला बदल करायचा आहे. सत्तेपुढे शहाणपणा टिकतं नाही म्हणतात पण आपल्याला शहाणपणाची सत्ता आपल्याला आणायची आहे. भगवा हातातून सुटू देऊ नका, तुम्ही तारीख ठरवा. पेणला सभा घेऊ. असं म्हणत त्यांनी या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या शशिर धारकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं स्वागत केलं आहे.
तर यावेळी अनंतर गीते देखील बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिशिर धारकर यांचा आज पक्षप्रवेश होत आहे. यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते पक्ष प्रवेश करत आहेत. तुम्ही जो उत्साह दाखवला आहे, हा प्रवेश पेणच्या राजकारणाला कलाटणी देणारा पक्ष प्रवेश असेल. मी उद्धव ठाकरे यांना शब्द देतो की, पुढचा पेणचा आमदार आपलाच असेल.