दिलीप वळसे पाटलांच्या टीकेवर रोहित पवारांचा पलटवार! म्हणाले, जवळच्या लोकांनी..,

दिलीप वळसे पाटलांच्या टीकेवर रोहित पवारांचा पलटवार! म्हणाले, जवळच्या लोकांनी..,

Rohit Pawar : राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर टीका-टीप्पण्या केल्या जात आहेत. कालच सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. वळसे पाटलांनी केलेल्या टीकेनंतर ते राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील नेत्यांच्या रडारवर असल्याचं दिसतंयं. नेत्यांच्या टीकेमध्ये आता आमदार रोहित पवारही(Rohit Pawar) सामिल झाले आहेत. रोहित पवार म्हणाले, शरद पवारांच्या जवळच्या नेत्यांमुळेच राष्ट्रवादीला पूर्णपणे बहुमत मिळालं म्हणत राष्ट्रवादीच्या बहुमताचं खापर त्यांनी वळसे पाटलांवरच फोडलं आहे.

Ahmednagar News : ‘सेल्फी’ काढायला गेला अन् जीवच गमावला… रंधा फॉलमध्ये पडून तरुणाचा मृत्यू

शरद पवारांच्या जवळच्या लोकांनीच चांगल्या पद्धतीने जबाबदारी पार पाडली नसल्याने राष्ट्रवादीला बहुमत मिळालं नसल्याचा पलटवार आमदार रोहित पवार यांनी केला आहे. काल एका कार्यक्रमादरम्यान बोलताना सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. वळसे पाटलांच्या टीकेवरुन राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये वादंग पेटलं आहे. अशातच आता रोहित पवारांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

BJP प्रवेशाच्या चर्चा असणारे अशोक चव्हाण थेट वर्किंग कमिटीमध्ये; यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदेंचेही प्रमोशन

काय म्हणाले दिलीप वळसे पाटील?
देशात शरद पवार यांच्या उंचीचा नेता कोणीही नाही. पण, महाराष्ट्रातील जनतेनं शरद पवार यांना बहुमत दिलं नाही. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या आहेत.

रिसॉर्टमध्ये दादा भुसे भेटले का? आदित्य ठाकरेंचे थेट फडणवीसांना टोमणा मारणारे उत्तर

त्यानंतर आमदार रोहित पवार म्हणाले, आता हे लोकं असंच म्हणणार आहे, कारण शरद पवारांच्या जवळ जे नेते होते त्यांनी चांगल्या पद्धतीने जबाबदारी पार न पाडल्यानेच राष्ट्रवादीला पूर्णपणे बहुमत मिळालं नाही, अशी खोचक टीका पवार यांनी केली आहे. तसेच शरद पवार यांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला होता, ज्यांना ताकद दिली, तेच लोकं आज त्यांच्यासोबत नसतील तर त्यांच्याबाबती बोलण्याचा त्यांना अधिकार आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे.

तसेच नोकर भरतीमध्ये राज्य सरकारकडून लागू करण्यात आलेल्या फीच्या मुद्द्यावरुनही त्यांनी सरकारला चांगलच धारेवर धरलं आहे. नूकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. वाढीव फीच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, नोकर भरतीत एक हजार रुपये फी कशासाठी? युपीएससी शंभर रुपये घेते तर तुम्ही एक हजार रुपये कशासाठी घेता? अशातही पेपरफुटीचे प्रकार घडतंच आहे. सर्व परिक्षा ऑफलाईन झाली पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube