मुंबईतील शाळा हायटेक होणार; शिक्षण विभागाकडून 4248 कोटींचा अर्थसंकल्प सादर

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी Mission SAMPURN अंर्तगत सहशालेय उपक्रमांस चालना देण्याकरीता मिशन SAFAL राबविण्यात येणार आहे.

  • Written By: Published:
मुंबईतील शाळा हायटेक होणार; शिक्षण विभागाकडून 4248 कोटींचा अर्थसंकल्प सादर

BMC Education Department Budget 2026-27 : आगामी काळात मुंबईतील शाळा हायटेक करण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने थोडा थोडका नव्हे तर, तब्बल 4248 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला आहे. मुंबई महापालिकेचा आर्थिक वर्ष 2026 -2027 साठी शिक्षण विभागाचा 4248.08 कोटी रुपयांचा पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सादर करण्यात आला आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री राजेश शिरवडकर यांच्यासमोर हा अर्थसंकल्प मांडला.

या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे. सायबर साक्षरतेचे ज्ञान देण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्याची तरतूद करण्यात आली आहे. डिजिटल युगाशी विद्यार्थ्यांना सुसंगत करण्यासाठी तंत्रज्ञानाधारित साधनसामग्री उपलब्ध करून देण्यावरही भर आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना ‘जादुई पिटारा’चे वाटप, शैक्षणिक गुणवत्तावाढीचे उपक्रम, शाळांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा अशा विविध योजनांचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. तब्बल पाच वर्षांनंतर नवनिर्वाचित प्रतिनिधींमार्फत सादर झालेल्या या अर्थसंकल्पामुळे शिक्षण क्षेत्रात नव्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचा २०२६-२७ साठी ४२४८.०८ कोटींचा अर्थसंकल्प

२०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता महसुली उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज ३७५८.०८ कोटी इतके प्रस्ताविण्यात आले आहे.

२०२६-२७ या वर्षासाठी भांडवली कामांच्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये ४९०.०० कोटी एवढी अर्थसंकल्पीय तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत ५८३.९८ कोटी अधिकची तरतूद

अर्थसंकल्प ‘ई’ निधी संकेतांक ३० अंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे महसुली उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज ३५४४.३४ कोटी एवढे असून सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता महसुली उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज ३७५८.०८ कोटी इतके प्रस्ताविण्यात आले आहे.

तसेच अर्थसंकल्प ‘ई’ निधी संकेतांक ३० अंतर्गत सन २०२५-२६ या वर्षाच्या भांडवली अर्थसंकल्पात १ ४११.३० कोटी प्रस्तावित करण्यात आलेली तरतूद सुधारित अंदाजात १ ३८६.७८ कोटी इतकी प्रस्तावित केली आहे. तसेच सन २०२६-२७ या वर्षासाठी भांडवली कामांच्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये १ ४९०.०० कोटी एवढी अर्थसंकल्पीय तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे.

डिजिटल क्लासरूम

पालिकेच्या १,२०३ शाळेतील ७,९५३ वर्गखोल्यात टप्प्याटप्प्याने led च्या माध्यमातून डिजिटल करण्यात येणार

अर्थसंकल्पीय तरतूद (प्राथमिक)- २३.३८ कोटी

अर्थसंकल्पीय तरतूद (माध्यमिक)- १.०८ कोटी

सन २०२६-२७ मध्ये देखील सुरु राहणाऱ्या कल्याणकारी योजना व उपक्रम

शालोपयोगी वस्तूंचा मोफत पुरवठाः २०२६-२७ व २०२७-२८ या वर्षांकरीता विद्यार्थ्यांना मोफत शालोपयोगी वस्तूंचा पुरवठा करण्यासाठीची निविदा प्रक्रिया उपप्रमुख अभियंता यांच्यामार्फत सुरु त्यात अर्थसंकल्पीय तरतूद (प्राथमिक) १५०.५७ कोटी अर्थसंकल्पीय तरतूद (माध्यमिक) ३७ कोटी ची करण्यात आलेली आहे…

पालिकेच्या शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे

मुंबई महापालिका शाळांमध्ये सुरक्षेसंदर्भात अर्थसंकल्पीत तरतूदीवर दिला भर

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शहर विभागातील शालेय इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेत

सन २०२५-२६ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपनगर विभागातील शालेय इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची कार्यवाही सुरुये

अर्थसंकल्पीय तरतूद (प्राथमिक) – ₹४२ कोटी

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मिशन SAFAL राबविण्यात येणार

S – Strength (Physical)
A – Activities (Scout – Guide)
F- Futuristic (Music)
A – Ambitious (Art)
L – Learning Skill of work Experience

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सर्व क्षेत्रांचा विचार करुन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून Mission SAMPURN राबविण्यात येत आहे. आता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी Mission SAMPURN अंर्तगत सहशालेय उपक्रमांस चालना देण्याकरीता आवश्यकतेनुसार नवीन शैक्षणिक उपक्रमांचा समावेश करुन मिशन SAFAL राबविण्यात येणार आहे.

ग्रंथालय अद्ययावतीकरण : महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना वाचन व स्वअध्ययनाची सवय लावणे तसेच भाषा व ज्ञानात्मक कौशल्ये वृध्दींगत करण्याच्या दृष्टीकोनातून शाळेतील वाचनालयांचे अद्ययावतीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये वाचनालयांस शैक्षणिक पुस्तके, स्पर्धा परीक्षा पूरक पुस्तके उपलब्ध करुन देण्यात येणार असून मुलभूत भौतिक सुविधा देखिल अद्ययावत करण्यात येणार आहेत.

अर्थसंकल्पीय तरतूद (प्राथमिक) – ₹ ५ कोटी

पर्यावरण संवर्धनावर अर्थसंकल्पीय तरतूद (प्राथमिक) – ₹ २.४० कोटी

विद्यार्थ्यांना लहान वयातच पर्यावरणाचे महत्व समजण्यासाठी व शाश्वत सवयी विकसित करण्यासाठी, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इयत्ता ५ वी ते इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांकरिता ‘इको वॉरियर्स’ शैक्षणिक पुस्तकांसह पर्यावारण संवर्धन उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या कृतीतून पर्यावरण पूरक उत्पादने बनविणे, टाकाऊ पदार्थांचा पुनर्वापर करणे, विटा बनविणे, Handmade Paper Preparation, विद्यार्थ्यांकडून Seed Balls, Herbal Garden तसेच कच-यापासून उपयुक्त वस्तू तयार करण्यात येणार आहेत.

आधुनिक शिक्षणावर अर्थसंकल्पात भर

शालेय विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान अवगत होण्यासाठी व बदलत्या काळानुसार आधुनिक शिक्षण मिळण्यासाठी इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांना सन २०२५-२६ मध्ये १९,३१७ टॅबचा पुरवठा करण्यात येत आहे.

अर्थसंकल्पीय तरतूद (प्राथमिक) – १० लाख

अर्थसंकल्पीय तरतूद (माध्यमिक) – २१.७३ कोटी

ग्रंथसंग्रहालयांना अनुदानः बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालकीची एकूण १९ सार्वजनिक ग्रंथालये ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय’ या संस्थेमार्फत चालविली जात आहेत. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील ग्रंथालयांच्या सभासद संख्येनुसार ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय’ या संस्थेस एकूण १३९ लाख इतके अनुदान देण्यात आले आहे. तसेच मुंबई शहराचा मानबिंदू असलेल्या ‘दि एशियाटिक सोसायटी’ या संस्थेस चालू आर्थिक वर्षात ₹७५ लाख इतके अनुदान देण्यात आले आहे. अर्थसंकल्पीय तरतूद (प्राथमिक) – ₹ २ कोटी

follow us