बीड जिल्ह्यातील सहा नगर परिषदांचे उमेदवार ठरले; वाचा, कुठ झाली आघाडी तर कुठ बिघाडी
बीड जिल्ह्यात आज सहा नगरपरिषदेच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.
बीड जिल्ह्यातील सहा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी (Beed) अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची आज शेवटच्या दिवशी मोठी गर्दी बघायला मिळाली. यात अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी बीड नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाकडून डॉ. ज्योती घुमरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नगरध्यक्षपदासाठी प्रेमलता पारवे तर काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी करुणा मस्के, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी स्मिता वाघमारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर एमआयएमकडून सुरेखा हर्ष शृंगारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
फलटणमध्ये बिग फाईट : रणजितसिंह -रामराजे पुन्हा एकदा भिडणार !
बीड नगरपरिषद
1) ज्योती घुमरे भाजपा
2) प्रेम लता पारवे राष्ट्रवादी अजित पवार गट
3) करुणा मस्के काँग्रेस
4) स्मिता वाघमारे राष्ट्रवादी शरद पवार गट
5) सुरेखा शृंगारे एम आय एम
माजलगाव नगरपरिषद नगराध्यक्षपदाचे उमेदवार
1) संध्या ज्ञानेश्वर मेंडके- भाजप
2) मेहेरीन बिलाल चाऊस- राष्ट्रवादी शरद पवार गट
3) निरोनिसा खलील आतार पटेल – राष्ट्रवादी अजित पवार गट
4) राधा तुकाराम येवले – शिवसेना (शिंदे गट)
गेवराई नगरपरिषद
1) शितल महेश दाभाडे, राष्ट्रवादी अजित पवार गट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार
2) गीता बाळराजे पवार भाजप नगरध्यक्ष पदाच्या उमेदवार
3) जबीन जानमोहमंद बागवान, राष्ट्रवादी शरद पवार गट
धारूर नगरपरिषद नगराध्यक्षपदाचे उमेदवार होणार चौरंगी लढत
1) रामचंद्र निर्मळ, भाजप
2) बालासाहेब जाधव,राष्ट्रवादी अजित पवार गट
3) अर्जुन गायकवाड, राष्ट्रवादी शरद पवार गट
4) सुरेश गवळी,शिवसेना शिंदे गट
अंबाजोगाई नगरपरिषद नगरध्यक्षपदाचे उमेदवार
1) राजकिशोर मोदी नगराध्यक्षपदाचे उमेदवार शरद पवार गट राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी
2) आसिफ उद्दीन खतीब, काँग्रेस
3) नंदकिशोर मुंदडा, भाजप
4) प्रमोद खंडू मस्के, वंचित बहुजन आघाडी.
परळी नगरपरिषदेत दोन्ही मुंडे भावंड एकत्र, तिरंगी होणार लढत
1) संध्या दीपक देशमुख, राष्ट्रवादी शरद पवार गट
2) सय्यद मैमुना बेगम हनीफ उर्फ बहादूर भाई, काँग्रेस
3) पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, राष्ट्रवादी-भाजप शिंदे गट महायुतीच्या उमेदवार
