मोठी बातमी! संगमनेरमध्ये सापडली एक कोटी रुपये असलेली बॅग, नक्की प्रकरण काय?
संगमनेरमध्ये सापडलेली १ कोटी रुपयांची रक्कम नेमकी कुणाची होती आणि कुठं जाणार होती? याबाबत लोक आता प्रश्न विचारत आहेत.
सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वार वाहत आहे. (Mumbai) नगर परिषदेच्याही निवडणुका आहेत. अशातच संगमनेर शहरात मोठी कारवाई केल्याचं समोर आलं आहे. शहराच्या प्रवेशद्वारावर निवडणूक आयोगाच्या पथकाने तपासणी दरम्यान एका वाहनातून तब्बल एक कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
आयोगाने शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनावर काटेकोर पाळत ठेवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आयोगाच्या पथकाने शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक वाहन थांबवून तपासणी केली. वाहनातील सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर अधिकाऱ्यांना वाहनातील व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. पुढील तपासात वाहनातून मोठी रोकड आढळताच पथकाने तत्काळ ती जप्त केली आणि संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
निवडणूक काळात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, महागड्या वस्तू किंवा इतर साहित्य मतदारांपर्यंत पोहोचवून मतांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो, अशी तक्रार आयोगाकडे अनेक वेळा नोंद होत असते. त्यानुसारच आयोगाने या निवडणुकीत विशेष पथके तैनात केली आहेत. संगमनेरमध्ये झालेली ही कारवाई देखील त्याच अनुषंगाने महत्त्वाची मानली जाते.
संगमनेरमध्ये सापडलेली १ कोटी रुपयांची रक्कम नेमकी कुणाची होती आणि कुठं जाणार होती? याबाबत लोक आता प्रश्न विचारत आहेत. या रकमेचा राजकीय व्यवहाराशी काही संबंध आहे का? किंवा ती इतर कोणत्या व्यवहारासाठी रक्कम वापरली जाणार होती का? याचा तपास निवडणूक आयोग, पोलिस विभाग आणि संबंधित तपास यंत्रणा करत आहेत.
