बिबट्याची दहशत…; विखेंचा तो किस्सा…; आमदार सत्यजित तांबे यांनी मांडले वास्तव
काही वर्षांपूर्वी विखे कुटुंब देखील बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले होते; आ तांबे यांनी मोर्च्यामध्ये केले वक्तव्य.
The Vikhe family narrowly escaped a leopard attack : सध्या राज्यात बिबट्याकडून मानवी वस्तीवर होणारे वाढते हल्ले यामुळे भीतीचे सावट पसरले आहे. राज्यभर सुरु असलेल्या या विषयावर अधिवेशनात देखील चांगलीच खडाजंगी झाली. यातच नगर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का काही वर्षांपूर्वी विखे कुटुंब(Vikhe Family) देखील बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले होते. आता विखे कुटुंब व बिबट्याचा हल्ला हा विषय का समोर आला तर त्याला कारणही तसेच आहे. विधानपरिषदेचे आमदार सत्यजित तांबे(Satyjeet Tambe) यांनी एका निषेध मोर्च्यामध्ये याबाबत वक्तव्य केले आणि राजकारण तापले. राजकीय द्वेषातून असे आरोप केले जात असल्याचे विखे समर्थक म्हंटले जाऊ लागले मात्र यामध्ये काय तथ्य आहे कि नाही हे आपण जाणून घेऊ…
अहिल्यानगर जिल्ह्यात बिबटयाचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अनेक लहान मुलांवर बिबट्याने हल्ला केल्याने हे प्रकरण चांगलेच तापले आहे. दरम्यान हिवाळी अधिवेशनामध्ये देखील हा मुद्दा चांगलाच गाजला. अनेकांनी यावर काही उपाय देखील सुचवले होते. यातच विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी देखील या प्रश्नावरून हिवाळी अधिवेशनामध्ये सभागृहाचे लक्ष वेधले होते. दरम्यान नुकतेच संगमनेर मध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एका चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. यावरून तांबे यांनी आक्रमक पवित्रा घेत संगमनेरमध्ये धरणे आंदोलन केले. प्रशासनाच्या कारभारावर देखील नाराजी व्यक्त केली. आपल्या भाषणामध्ये तांबे यांनी विखे कुटुंबावर बेतलेला एक प्रसंग यावेळी सांगितला. मात्र याच मुद्द्यावरून तांबे यांच्यावर टीका टिपण्णी सुरु झाली. नेमकं काय ते प्रकरण आहे ते आपण जाणून घेऊ…
राम सुतार यांच्या निधनान शिल्पकलेचा साधक देशाने गमावला- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
विखे कुटुंब थोडक्यात बचावले
घटना आहे ऑगस्ट 2020 मधील…खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची सहा वर्षांची कन्या अनिशा आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कन्या सुस्मिता यांचा सहा वर्षांचा चिरंजीव जयवर्धने व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे हे लोणी येथील शेतात नातवंडांना जेवू घालत असताना अचानक तिथे बिबट्या आला व तो झेप घेणार तेवढ्यात समोरील कुत्र्यावर त्याने झेप घेत त्याची शिकार केली. व अवघ्या पाच फुटावर विखे यांचे नातवंड खेळत होते मात्र देव तारी त्याला कोण मारी ही म्हण याठिकाणी पाहायला मिळाली. याचाच अर्थ सर्वसामान्य असो की नेतेमंडळी बिबट्याचे वाढते हल्ले हि एक मोठी समस्यां बनली आहे.
बिबट्यांचे वाढते हल्ले…तांबें संतापले
बिबट्यांच्या हल्ल्याच्या वाढत्या घटनांमुळं शेतकरी, नागरिक आणि लहान मुलांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. नागरिकांवर सातत्याने नरभक्षक बिबट्यांनी हल्ले केले आहेत. वेळोवेळी मागणी करुनही शासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्यानं तांबे यांच्यासह नागरिकांनी ‘बिबट्या हटवा, माणूस वाचवा’ ही मागणी केली. दरम्यान वनविभाग बिबट्या पकडतात व एकीकडचा बिबट्या पकडायचा आणि जवळच नेऊन सोडायचा, हा उपाय नाही. बिबटे आता जंगलात राहत नाहीत. ऊस व इतर पिकांमध्ये लपून बसत आहेत. तालुक्यात आज शंभर ते दीडशेहून अधिक बिबटे आहेत. त्यामुळे नसबंदी हाच दीर्घकालीन आणि प्रभावी उपाय आहे.
मोठी बातमी, अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी; प्रशासन अलर्ट मोडवर
बिबट्यांचे हल्ले…तांबे यांनी सुचविले उपाय
माणसांवर होणारे बिबट्यांचे हल्ले ही नित्याची बाब झाली आहे. अशा परिस्थितीत वनविभागाने युद्धपातळीवर पुढील उपाययोजना तात्काळ राबवाव्यात. यामध्ये पिंजऱ्यांची संख्या तातडीने वाढवावी. जेरबंद केलेल्या बिबट्यांना या वनक्षेत्राबाहेरील इतर जंगलात स्थलांतरित करावे. बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी नसबंदीची ठोस कार्यवाही करावी. या उपायोजना राबवाव्यात अशी मी अनेकदा अनेक व्यासपीठांवर मागणी केली आहे. मात्र, याबाबत कारवाई होत नसल्यामुळे मानवी वस्त्यांमध्ये मोकाट फिरणारे बिबटे आमच्या माता भगिनींचा, चिमुकल्यांचा जीव घेत आहेत.
वनविभागाच्या कारभारावर मंत्र्यांची देखील नाराजी
बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमध्ये निरपराध नागरिकांचा जाणारा बळी यामुळे वनविभागाच्या कारभारावर आता नाराजी व्यक्त केली जाऊ लागली आहे. काही दिवसांपूर्वी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील वनविभागाच्या कारभारावर चांगलेच ताशेरे ओढले होते. अद्यावत यंत्रणेच्या साह्याने बिबट्या पकडले पाहिजे, यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी देखील मंजूर केला जाईल, असं विखे म्हणाले होते. मात्र वनविभागाचे कर्मचारी केवळ दिखाऊ कामगिरी करत असल्याने याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो आहे.
