मोठी बातमी, अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी; प्रशासन अलर्ट मोडवर

Ahilyanagar District Collector Office : अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली असल्याची माहिती मिळाली आहे.

  • Written By: Published:
Ahilyanagar District Collector Office

Ahilyanagar District Collector Office : अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली असल्याची माहिती मिळाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी मिळताच जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले असून या प्रकरणात पुढील तपास सुरु करण्यात आला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, 18 डिसेंबर रोजी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. कार्यलयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने बाहेर काढण्यात आले आहे.  बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहोचले असून कार्यालयाची सखोल तपासणी सुरु आहे.

तर दुसरीकडे नागपूर जिल्हा सत्र न्यायालय आणि मुंबईतील बांद्रा न्यायालय बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या मेलआयडीवर मेल करत नागपूर जिल्हा सत्र न्यायालया बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांना माहिती मिळताच पोलीस अलर्ट मोडवर असून पुढील तपास करण्यात येत आहे. याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून सत्र न्यायालय परिसरात सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

राम सुतार यांच्या निधनान शिल्पकलेचा साधक देशाने गमावला- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

तर मुंबईतील बांद्रा न्यायालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देखील ई-मेलवर प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण परिसर खाली करण्यात आला आहे. न्याायालयात बॉम्ब निरोधक पथक आणि पोलिसांनी तपास सुरु केला आहे. सुरक्षादलांनी संपूर्ण परिसराची कसून तपासणी केली. मात्र तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. या धमकीमागील स्रोत शोधणे, धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवणे आणि त्यामागील हेतू स्पष्ट करणे यासाठी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे

देवेंद्र फडणवीस टप्या-टप्प्यांने गेम करणार अन्…, खासदार राऊतांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा

follow us