शिवराय असते तर विधानसभेत जावून कापून काढले असते; राज ठाकरे मुख्यमंत्री, पंतप्रधानांवर बरसले !
Raj Thackeray-इराणला आपण साथ दिली पाहिजे. इराण आपल्याला तेल रुपयामध्ये देत होते. खामेनी गेल्यानंतर आपले पंतप्रधान एक वाक्य बोलले नाहीत.
Raj Thackeray: मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS Gudi Padwa Melava) गुढीपाडवा मेळाव्यात मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय. महाराष्ट्रात आता तीन वर्ष निवडणुका नाहीत. त्यामुळे आता आमदार-खासदारांची कंत्राटदारी असल्याचा टोला राज ठाकरे यांनी लावलाय.
राज ठाकरे म्हणाले, युद्धामुळे गॅस मिळत नाही. काही गोष्टी आपल्याकडून राहून गेल्या आहेत. इराण आपल्याला इतकी वर्षे साथ देत होता. त्या इराणवर हल्ले होत आहे. इराणला आपण साथ दिली पाहिजे. इराण आपल्याला तेल रुपयामध्ये देत होते. खामेनी गेल्यानंतर आपले पंतप्रधान एक वाक्य बोलले नाहीत. जम्मू-काश्मीरमुद्दावर त्यांनी आपल्याला पाठिंबा दिला होता. पण देश आणि राज्य कुठं चाललं माहित नाही.
सरकारला प्रश्न विचारू नये म्हणून गुंतवलय
सरकारला प्रश्न विचारू नये म्हणून चित्रपट आयपीएल, चित्रपट, टेलिव्हिजन, मोबाइलमध्ये अडकले आहे. तुम्हाला गुंतवून टाकले आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी प्रश्न विचाराले जात नाही, असे राज ठाकरे म्हणाले. विचित्र परिस्थितीत देश, राज्य अडकविले आहेत. खालून काठी नाही बसली तर वरून काठी बसते, असे राज ठाकरे म्हणाले. करमणुकीच्या गटारगंगेत वाहून जावू नका. मोबाईलमध्ये अडकलो आहोत. काय महाराष्ट्राचे परिस्थिती लावली आहे. मुख्यमंत्री फडणवीस सांगतात तीन ट्रिलियनची अर्थव्यवस्था करणार आहे. पण अकरा लाख कोटी रुपये कर्ज केले आहे.
सगळं आपल्या हातातून गमावून बसत आहे-राज ठाकरे
शहरं कोलमडून पडलेली आहेत. मध्यंतरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटलो होतो. शहराचे प्रश्न मांडले आहे. पण सगळं आपल्या हातातून गमावून बसत आहोत. ग्रामीण भागातील तरुण शेती कसायला तयार नाही. तुम्ही रस्त्यावर यायला तयार नाही, असाच सडा. महाराष्ट्रात रोज शेतकरी आत्महत्या होतात. कुणालाही काहीही पडलेलं नाही. कोस्टल रोड हा इतरांना आत येण्यासाठी आणि आम्हाला बाहेर काढणारा रस्ता आहे. सगळ्या शहरातील जमिनी चालल्या आहेत. उद्योगपतींना जमिनी विकल्या जात आहे.
महाराष्ट्र विकायला काढलाय
दक्षिण, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ गुजरात बघा. आमचे आमदार खासदार हे कंत्राटदाराकडे बघतात. महाराष्ट्र विकायला काढला आहे. मुख्यमंत्र्यांकडे गृहखातं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ड्रग्स विकले जात आहे. शाळा, कॉलेजमध्ये ड्रग्ज विकले जात आहे. राज्यात मुले आणि मुली गायब होत आहेत. आम्हाला कुणाचीच पडलेली नाही. तुमच्या भाषेची हमी नाही. तुमची हमी नाही. पोरांबाळांची हमी नाही. कसलीच हमी नाही आणि म्हणता शिवरायांचा महाराष्ट्र. शिवराय असते तर विधानसभेत कापून काढले असते, असे राज ठाकरे म्हणाले.