निलेश लंकेच्या चुकीची पुनरावृत्ती अमोल खताळांनी केली… संगमनेरच्या जनतेने अद्दल घडवली
Amol Khatal लंकेंनी पत्नीला उमेदवारी दिल्याचं उदाहरण ताज असताना थोरातांचा पराभव करणाऱ्य खताळांनी संगमनेर नगरपंचायतीमध्ये तीच चूक केली.
Sangamner Municiple Corporation Election Amol Khatal mistake repeated of Nilesh Lanke’s : सध्या राज्यात निवडणुकीचे वारे वाहत असून 2024 ची लोकसभा निवडणूक ज्या पद्धतीने गाजली. त्याच पद्धतीने गाजली अहिल्यानगर उत्तरची लोकसभा निवडणुक कारण यामध्ये सुजय विखेंचा पराभव करत निलेश लंके हे जायंट किरल ठरले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत लंके यांनी विधानसभेची उमेदवारी आपल्या पत्नी राणी लंके यांना दिली. मात्र त्यामध्ये राणी लंके यांचा पराभव झाला. हे उदाहरण ताज असतानाच 2024 च्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांचा पराभव पराभव करून विजयी झालेल्या अमोल खताळ यांनी संगमनेर नगरपंचायत निवडणुकीमध्ये तीच चूक केली. त्यांनी आपल्या वहिनी सुवर्णा खताळांना उमेदवारी दिली. मात्र जनतेने त्यांना नाकारले. यामुळे लंके यांच्याकडून झालेल्या चुकीची पुनरावृत्ती अमोल खताळ यांनीही केलीअसल्याचं बोललं जात आहे.
संगमनेरमध्ये नेमकं काय घडलं?
2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव नव्हते उमेदवार असलेले शिवसेनेचे अमोल खताळ यांनी केला त्यानंतर मतदारसंघांमध्ये देखील खताळ यांची एक वेगळीच लाट निर्माण झाल्याचे देखील दिसलं त्या पाठोपाठ झालेल्या संगमनेर नगरपंचायत निवडणुकीमध्ये खताळ यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी आपल्या वहिनी सुवर्ण खताळ यांना दिली.
सांगलीतील बॅनरची राज्यभर चर्चा, जयंत पाटलांनी कुणाचा करेक्ट कार्यक्रम केला?
ज्या पद्धतीने घराणे शाहीचा आरोप विधानसभा निवडणुकीमध्ये खताळ यांनी बाळासाहेब थोरातंवर केला मात्र संगमनेरच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खताळणी देखील घराणेशाही करत आपल्याच घरी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील नाराजीचा सूर हा पहिल्या दिवसापासूनच होता. खतांची थेट लढत ही संगमनेर मध्ये प्रस्थापित असलेले तांबे घराणे विरोधात होती.
मोठी बातमी! प्रशांत जगताप यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाला रामराम, नक्की काय घडलं?
मैथिली तांबे विरुद्ध सुवर्ण खताळ असा थेट सामना झाला मात्र या निवडणुकीमध्ये खताळण विरोधात असलेला नाराजीचा सूर हा थेट मतदानाच्या स्वरूपातून समोर आला व संगमनेर करांनी तांबे यांच्या संगमनेर सेवा समितीचे उमेदवार निवडून दिले तसेच नगराध्यक्ष पदाची माळ देखील विरोधी पक्षाचे आमदार सत्तेचे तांबे यांच्या पत्नी मैत्री तांबे यांच्या गळ्यात घातली.
लवकरच २२ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची धमाल, प्रेक्षकांसाठी ५६ चित्रपटांची पर्वणी
खताळांसाठी विधानसभेवेळी असलेली लाट मात्र नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये दिसून आली नाही खताळ यांचा झालेला पराभव पाहता 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने निलेश लंके यांनी शिवसैनिकांना डावलून पारनेरची उमेदवारी ही आपली पत्नी राणी लंके यांना दिली मात्र नाराज शिवसैनिकांनी मतदानाच्या माध्यमातून पारनेर मध्ये चित्र पलटवले.
प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक रणजित पाटील यांचं निधन, अवघ्या 42 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुजय विखे विरोधात नाराजीचा सूर असल्याने जनतेने मतदारांनी निलेश लंके यांना खासदार बनवले मात्र त्याच निलेश लंके यांनी ज्यावेळेस विधानसभा निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना बाजूला सारत आपल्या पत्नीला उमेदवारी दिली त्यावेळेस नाराज मतदारांनी तसेच शिवसैनिकांनी लंकेंना डावलून काशिनाथ दाते यांना आमदार बनवले त्याच घटनेची पुनःवृत्ती संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये समोर आली.
लाट ओसरली खताळांसाठी पुढचा काळ कठीण
विधानसभा निवडणुकीमध्ये जरी 40 वर्षाची सत्ता असलेल्या थोरात यांचे बालेकिल्लात अमोल खताळ यांनी नसतानाबूत केला मात्र त्याची परतफेड बाळासाहेब थोरात व सत्यजित तांबे यांनी संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये केली. संगमनेर सेवा समितीचे मोठ्या संख्येने उमेदवार हे निवडून आले यामुळे कुठेतरी संगमनेर मध्ये महायुतीला मोठा धक्का बसला तसेच खतांची ओसरती लाट त्यांच्यासाठी पुढील राजकीय वाटचाल देखील कठीण बनवत आहे असं चित्र सध्याच्या निवडणुकीतून स्पष्ट झाले.
