राजकीय पक्ष निवडणुकांमध्ये उमेदवारांना देतात तो एबी फॉर्म नेमका काय असतो? जाणून घ्या सविस्तर…

AB form आपण उमेदवारांना एबी फर्म वाटयला सुरूवात अशा बातम्या कानावर पडतात. मात्र हा एबी फॉर्म नेमका काय असतो? जाणून घेऊ सविस्तर...

AB Form

What is the AB form that political parties give to candidates during elections : सध्या राज्याच्या राजकारणामध्ये नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता महानगर पालिकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यात आज 30 जानेवारी रोजी महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. यावेळी आपण उमेदवारांना एबी फर्म वाटयला सुरूवात किंवा एखाद्या उमेदवाराला एबी फॉर्म नाकारल्याने त्याने बंडखोरी केली अशा बातम्या निवडणुका आल्या की वारंवार कानावर पडतात. मात्र हा एबी फॉर्म नेमका काय असतो? तो कसा असतो जाणून घेऊ सविस्तर…

संभाजीनगरमध्ये भाजपच्या अहंकारामुळे शिवसेना-भाजप युती तुटली; संजय शिरसाटांची घोषणा

वरवर पाहिलं तर एबी फॉर्म म्हणजे उमेदवाराला निवडणूक लढवण्यासाठी लागणारा उमेदवारी अर्ज असतो. जो निवडणूक आयोगाकडे भरून द्यायचा असतो. पण याची गरज, यामधील आवश्यक माहिती ती अचूक असणे या सर्व गोष्टी अत्यंत बारकाईने तपासल्या जातात. राजकीय पक्षांकडून त्यांचे उमेदवार जाहीर केले जातात. मात्र ज्याच्याकडे पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म असतो. तोच पक्षाचा अधिकृत उमेदवार असतो. त्यालाच संबंधित पक्षाच्या चिन्हावर निवडणुक लढवता येते.

मोठी बातमी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून गुंड गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी

तर या फॉर्मबद्दल सांगायचं झालं तर एबी असं म्हटलं जात असलं तरी ए आणि बी हे दोन्ही फॉर्म वेगवेगळे असतात. ए फॉर्ममध्ये मान्यातप्राप्त राजकीय पक्ष , मुख्य निवडणूक अधिकारी, संबंधित मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यात केला जाणाऱ्या पत्राचा अधिकृत नमुना आहे. त्यात पक्षाने कुणाला अधिकृत उमेदवारी दिलीय याची माहिती असते. त्यावर पक्षाचा शिक्का, अध्यक्ष किंवा सचिवांची सही असते.

Election LIVE Update’s : पुण्यात महायुतीत खळ्ळखट्याक; भाजप-शिनसेनेची युती तुटली

तर बी फॉर्म हा राजकीय पक्षाने नेमलेल्या पदाधिकाऱ्याकडून संबंधित मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला पाठवण्यात येणाऱ्या पत्राचा नमुना असतो. ज्यामध्ये हाच पक्षाचा अधिकृत उमेदवार असून त्यालाच पक्षाचं चिन्ह मिळावं अशी शिफारस कलेली असते. तसेच हा अर्ज काही कारणांनी बाद झाल्यास कोणत्या उमेदवाराला उमेदवारी द्यावी त्याचं पर्यायी नाव आणि माहिती असते.

‘हक़’च्या यशावर यामी गौतम धरच्या साधेपणाने जिंकली मनं, जाणून घ्या तिने श्रेय कुणाला दिलं?

कारण अशा अनेक घटना घडतात ज्यामध्ये अर्जाच्या छाननीच्या वेळी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा अर्ज काही तांत्रिक कारणांमुळे बाद ठरतो. किंवा एखादा उमेदवार अर्ज मागे घेतो. तेव्हा पक्षाने बी फॉर्ममध्ये उल्लेख केलेला पर्य़ायी उमेदवार हा पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवतो.

follow us