Election LIVE Update’s : दीपक मानकरांचा एक मुलगा भाजपकडून तर, दुसरा राष्ट्रवादीकडून मैदानात

हापालिकांच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे अनेक उमेदवारांची धावपळ सुरू असल्याचं चित्र आहे.

  • Written By: Published:
Election Update LIVE : पुण्यात महायुतीत खळ्ळखट्याक; भाजप-शिनसेनेची युती तुटली

Muncipal Corporation Updates :  मुंबई, ठाणे, पुण्यासह 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून राज्यभरात निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून रखडलेला महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युलाही फायनल झाला आहे. मुंबईमध्ये भारतीय जनता पक्ष १३७ जागा लढवणार असून शिवसेना शिंदे गटाला ९० जागा देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे ठाण्यात 131 जागांपैकी शिवसेनेला 87 जागा तर मित्र पक्ष असणाऱ्या भाजपला 40 जागा देण्यात आल्या आहेत.तर मुंब्रा विकास आघाडीला 4 जागा सोडण्यात आल्या आहेत. आज महापालिका निवडणुकांचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून मोठ्या घडामोडी पाहायला मिळणार आहेत. पुणे, मुंबई आणि अहिल्यानगरसह महत्त्वाच्या महापालिकांचे क्षणोक्षणाचे अपटेड देणारा लेट्सअपचा लाईव्ह ब्लॉग…

LIVE NEWS & UPDATES

  • 30 Dec 2025 12:23 PM (IST)

    खासदार नरेश म्हस्के यांना झटका, मुलाला उमेदवारी नाकारली

    खासदार नरेश म्हस्के यांना निवडणुकांच्या तोंडावर मोठा झटका बसला असून, म्हस्केंचा मुलगा आशुतोष म्हस्के याचे तिकीट कापण्यात आले आहे. मुलाला तिकिट मिळावे याकरता म्हस्केंनी टाईट फिल्डिंग लावली होती पण, अखेर म्हस्केंचे डाव अपयशी ठरल्याचे तिकीट नाकारल्यामुळे स्पष्ट झाले आहे.

  • 30 Dec 2025 12:17 PM (IST)

    भाजपचा ‘डॅमेज’ कंट्रोलचा प्रयत्न; मुंबईसाठी ‘मराठी’ कार्ड खेळत दिली अनेकांना संधी

    भाजपने 29 डिसेंबर रोजी 68 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली. यामध्ये 31 पुरूष उमेदवारांचा तर 37 महिला उमेदवारांचा समावेश आहे. यात लक्षवेधणारी गोष्ट म्हणजे तब्बल 46 मराठी उमेदवारांना भाजपनं संधी दिली आहे. त्यामुळे हिंदी भाषेच्या सक्तीवरून विरोधकांचा रोषाला सामोरे जावे लागलेल्या भाजपनं डॅमेज कंट्रोलसाठी BMC साठी मराठी कार्ड बाहेर काढल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

    BMC Election : भाजपचा ‘डॅमेज’ कंट्रोलचा प्रयत्न; मुंबईसाठी ‘मराठी’ कार्ड खेळत दिली अनेकांना संधी

  • 30 Dec 2025 12:16 PM (IST)

    पुणे तिथे काय उणे! उमेदवाराने अर्ज शुल्क म्हणून भरली 5 हजार रुपयांची चिल्लर

    महानगरपालिका निवडणुकांची घोषणा केल्यानंतर राज्यभरात राजकीय वातावरण तापलं आहे. उमेदवारांची धावपळ सुरू असून, इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यालयांकडे गर्दी केली आहे. अनेक पक्षांनी आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले असून, काही अपक्ष उमेदवारही जोरदार तयारीत उतरले आहेत. मात्र या सगळ्या गडबडीत पुण्यातून(Pune) एक असा प्रकार समोर आला आहे, जो सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरतो आहे.

    पुणे तिथे काय उणे! उमेदवाराने अर्ज शुल्क म्हणून भरली 5 हजार रुपयांची चिल्लर

  • 30 Dec 2025 12:10 PM (IST)

    दीपक मानकरांच्या दोन मुलांना उमेदवारी

    राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे नेते दीपक मानकर यांची दोन्ही मुलं निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहेत. एकाला भाजपने तर दुसऱ्याला राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. बापू मानकर भाजपकडून तर हर्षवर्धन मानकर राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली आहे. दोन्ही पक्षाकडून मुलांना उमेदवारी मिळाल्याने आता दीपक मानकर नेमका राष्ट्रवादीचा प्रचार करणार की भाजपचा अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

  • 30 Dec 2025 11:36 AM (IST)

    कार्यकर्त्यांचा हा अपमान मी कदापि सहन करणार नाही - आठवले

    महायुतीच्या स्थापनेपासून आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे आणि खंबीरपणे सोबत राहिलो आहोत, मात्र आज जागावाटपाच्या बाबतीत जो प्रकार घडला आहे, तो निव्वळ विश्वासघात आहे. चर्चेसाठी काल दुपारी ४ वाजताची वेळ निश्चित करण्यात आली होती, मात्र मित्रपक्षांकडून त्याचेही पालन करण्यात आले नाही. हा प्रकार म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय नसून आमच्या स्वाभिमानावर केलेला आघात आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर असताना कार्यकर्त्यांचा हा अपमान मी कदापि सहन करणार नाही. त्यामुळेच आज माझे कार्यकर्ते जो काही निर्णय घेतील, तो मला पूर्णपणे मान्य असेल.

  • 30 Dec 2025 11:30 AM (IST)

    रुपाली ठोंबरे पाटील यांना अधिकृत उमेदवारी जाहीर

    रुपाली ठोंबरे पाटीलाला अजित पवार गटाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ठोंबरे यांना प्रभाग क्रमांक २६ मधून अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे.

  • 30 Dec 2025 11:18 AM (IST)

    संभाजीनगरात भाजप - शिवसेनेची युती तुटली

    पुणे, अहिल्यानगर पाठोपाठ छ.संभाजीनगरमध्येही भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतील युती तुटल्याची घोषणा आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना-भाजप युती व्हावी यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनी प्रयत्न केला. आम्ही देखील स्थानिक पातळीवर वारंवार बैठकांचा प्रयत्न केला. पण स्थानिक भाजप कार्यकर्ते हे पहिल्यापासूनच वेगळ्या भूमिकेत होते. त्यावेळी शंका आली तरी वरिष्ठांच्या आग्रहास्तव युतीचा प्रयत्न केला गेलाभाजपच्या अहंकारामुळे युती तोडतोय अशी घोषणा संजय शिरसाट यांनी केली आहे.

     

  • 30 Dec 2025 11:14 AM (IST)

    शरद पवार पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी मतदारसंघातून तुतारी केली गायब

    महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तिकिटाच्या अपेक्षेने एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांची कमालीची संख्या वाढली आहे. मात्र ज्या पक्षाने आपल्याला आमदार केलं त्या पक्षाची निशाणीच आपल्या हक्काच्या प्रभागातून गायब करण्याचं काम शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील एकमेव आमदार बापूसाहेब पठारे यांच्याकडून होतांना दिसत आहे.  सविस्तर बातमी खालील लिंकमध्ये...

    Pune Politics : शरद पवार पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी मतदारसंघातून तुतारी केली गायब

  • 30 Dec 2025 11:10 AM (IST)

    गुंड गजा मारणेच्या पत्नीला अजितदादांकडून उमेदवारी

    कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात...

    पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणेला अजित पवार गटाकडून प्रभाग १० बावधन मधून एबी फॉर्म देण्यात आलाय.

    जयश्री मारणे या अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवार

    गुन्हेगारी मिटवा म्हणणाऱ्या अजित पवारांनी गजा मारणेच्या पत्नीला दिली उमेदवारी

     

follow us