मुंढवा जमीन खरेदी प्रकरणी दुसरा गुन्हा दाखल; पार्थ पवारांवरही फौजदारी कारवाई होणार?

Parth Pawar वादग्रस्त जमीन खरेदीत अडचणीत आलेत. यामध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. पार्थ पवारांवरही गुन्हा दाखल होणार? असा सवाल उपस्थित झाला आहे.

Parth Pawar

Second case registered in Mundhwa land purchase case; Will criminal action be taken against Parth Pawar too : पुण्यातील मुंढवा भागातील वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार अडचणीत आले आहेत. याप्रकरणामध्ये नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. त्यात आता या प्रकरणी गुन्हे देखील दाखल झाले आहेत. त्यामुळे आता पार्थ पवारांवरही गुन्हा दाखल होणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे. यावर सहनोंदणी महानिरीक्षक रविंद्र मुठे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

पार्थ पवारांवरही गुन्हा दाखल होणार?

या प्रकरणी आता प्रार्थ पवार हे संचालक असलेल्या अमेडिया कंपनीवर आता गुन्हा दाखल होणार आहे. मुद्रांक शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. यामध्ये जुना 7/12 दाखवून हा व्यवहार करण्यात आल्याने सब रजिस्टारवरही गुन्हा दाखल होणार आहे. ही माहिती सहनोंदणी महानिरीक्षक रविंद्र मुठे यांनी दिली. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये सरकारची फसवणूक केल्याबद्दल पार्थ पवारांवरही फौजदारी कारवाई होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

कंपनीला टाळे अन् पोलिसांकडून शोध सुरु; शीतल तेजवानीचा संशयास्पद भूतकाळ समोर

दरम्यान या प्रकरणामध्ये आता पर्यंत 3 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यामध्ये पार्थ पवारांचे मामे भाऊ आणि व्यावसायिक भागीदार असलेले दिग्विजय अमरसिंग पाटील यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये या जागेची पॉवर ऑफ अॅटर्नी असलेल्या शितल तेजवानी आणि रविंद्र तारू यांचा समावेश आहे. मात्र या कंपनीमध्ये 99 टक्के भागीदारी असलेल्या पार्थ पवारांवर मात्र गुन्हा न दाखल करण्याचा अजब प्रकार पोलिसांनी या कारवाई दरम्यान केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे 1 लाख रुपये आहे. या कंपनीने 1800 कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची 300 कोटींमध्ये खरेदी केली.तसेच या खरेदीसाठी स्टॅम्प ड्युटी फक्त 500 रुपये असल्याचा दावा अंबादास दानवे यांनी करत या प्रकरणात सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती.

follow us