धक्कादायक! लग्नाला नकार दिल्याने मुलीच्या वडिलांना रस्त्यात अडवून बेदम मारहाण
या घटनेबाबत माहिती मिळल्यानंतर तात्काळ शहापूर पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
कोल्हापुरात फक्त मुलीचं लग्न लावून देण्यास नकार (Crime) दिल्याच्या कारणावरुन चक्क कटरने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. हल्ल्यामध्ये शब्बीर शेख, शाबीर शेख आणि सोहेल शफिक शिरोळे (रा. समर्थनगर) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी तिघांविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
यड्राव येथील पार्वती औद्योगिक वसाहतीच्या प्रवेशद्वाराजवळ शब्बीर डोंगरीसाब शेख (वय 39, रा. समर्थनगर तारदाळ) यांनी त्यांच्या मुलीचं लग्न लावून देण्यास नकार दिला. त्यावरून ही घटना घडली आहे. यातील साहिल रशीद सय्यद, साजीद रशीद सय्यद आणि आरमान मोमीन यांच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी शिवीगाळ आणि थेट मारहाण प्रकरणी सय्यद बंधूंना अटकही करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा हादरला! पिंपरी चिंचवडमध्ये मित्रांकडून केला गोळीबार, व्यावसायिकाचा मृत्यू
यड्राव येथील पार्वती औद्योगिक वसाहतीच्या प्रवेशद्वारासमोर शेख यांना अडवत मुलीच्या लग्नासंदर्भात काही जणांकडून विचारणा करण्यात आली. आपल्या मुलीच्या सांगण्यावरून शब्बीर डोंगरीसाब शेख यांनी लग्न लावून देण्यास नकार दिला होता. याला तोंड देताना संशयितांनी शिवीगाळ करत त्यांच्यावर तसंच, घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केली. या मारहाणीमध्ये सोहेल शफिक शिरोळे गंभीर जखमी झाला.
शब्बीर डोंगरीसाब शेख आणि त्यांचा भाऊ शाबीर शेख हेही या हल्ल्यात जखमी झाले. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याबाबत माहिती मिळताच शहापूर पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
फरार असलेल्या आरमान मोमीनच्या शोधासाठी पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, फक्त लग्नाच्या कारणावरुन अचानकपणे ही गंभीर घटना घडली आहे. ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने अधिक संयम आणि संवादाच्या मार्गांचा अवलंब करा, असं आवाहन सर्व नागरिकांना केलं आहे.
