Nashik Crime : कंटाळा आला होता, म्हणून मी माझ्या आईचा खून केला…मला अटक करा, कलियुगातील मुलाचा प्रताप

नाशिकमधील जेल रोडवरील शिवाजीनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे.

Nashik Crime News

Son Killed Mother In Jail Road Nashik : नाशिकमधील जेल रोडवरील शिवाजीनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. जी ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. आई-मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी ही भयानक घटना आहे. एका मुलाने आपल्या आईची निर्घृण हत्या केली. इतकंच नाही, तर त्याने स्वत: पोलीस ठाण्यात जावून घटनेची कबुली दिली. यावेळी त्याने पोलिसांना जे काही सांगितलं, ते जास्तच भयंकर आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. एक मुलगा आपल्याच आईविरुद्ध इतका घृणास्पद गुन्हा कसा करू शकतो, याचं सर्वांना आश्चर्य वाटतंय.

आईचा गळा दाबून खून केला

नाशिकमधील जेल रोड शिवाजीनगर भागातील (Son Killed Mother) रहिवासी 58 वर्षीय अरविंद मुरलीधर पाटील यानी मंगळवारी रात्री त्याच्या 80 वर्षीय आई यशोदाबाई मुरलीधर पाटीलची गळा दाबून हत्या (Nashik) केली. गुन्हा केल्यानंतर, आरोपी अरविंद पाटील नाशिक रोड पोलिस ठाण्यात गेला आणि म्हणाला, मला कंटाळा आला होता, बोर झालं होतं. त्यामुळे मी माझ्या आईचा गळा दाबून खून (Crime News) केला. मला अटक करा.

घराची झडती घेतली, तेव्हा…

अरविंद उर्फ ​​बाळू पाटील मानसिकदृष्ट्या आजारी आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्या घराची झडती घेतली. घराची झडती घेतली असता त्यांना त्याची वृद्ध आई यशोदाबाई पाटील यांचा मृतदेह आढळला. नाशिक रोड पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरविंद उर्फ ​​बाळू पाटील हा मानसिक आजारी असल्याचे कळले आहे. तो विवाहित आहे आणि त्याच्या मानसिक स्थितीमुळे त्याची पत्नी त्याला सोडून गेली.

सर्वजण हादरले

ही घटना शिवाजीनगर परिसरातील नागरिकांसाठी धक्का देणारी असून, सर्वजण हादरलेले आहेत. पोलीस तपास सुरू आहे. आरोपीच्या मानसिक स्थितीचा सविस्तर अहवाल तयार केला जात आहे.

 

follow us