देवभूमीत मन सुन्न करणारी घटना! तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करुन हत्या…

नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळमध्ये तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करुन हत्या केल्याची घटना समोर आलीयं.

Nashik

Nahsik News : नाशिकच्या मालेगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीयं. एका तीन वर्षीय चिमुकलीवर 24 वर्षीय आरोपीने अत्याचार करुन दगडाने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीयं. या घटनेनंतर नाशिकसह संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली असून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मन सुन्न करणाऱ्या घटनेमुळे सर्वत्रच संताप व्यक्त केला जात आहे.

पक्षाचे अस्तित्व संपुष्टात येतंय, हे वेळेत ओळखलं दिसतंय; विखेंची शरद पवारांवर बोचरी टीका

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे ३ वर्षांच्या मुलगी आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होती. या गावामध्ये राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणाने चिमुकलीसोबत अत्याचार केले. त्यानंतर ही गोष्ट तिने कुणाला सांगू नये, म्हणून त्याने तिची हत्या केली. विजय संजय खेरनार (२४ वर्षे) असं आरोपी तरुणाचे नाव आहे. विजयने मुलीची हत्या केल्यानंतर तो फरार झाला होता.

तब्बल 99 वर्षांचं मोहिते पाटलांचं साम्राज्य संपवण्यासाठी भाजप मैदानात, काय आहे राजकीय गणित?

या घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी मालेगाव मेडिकल कॉलेजमध्ये पाठवला. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या घटनेमुळे नाशिकमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

follow us