Nashik Earthquake : नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; जमीन हादरली
Nashik Earthquake : नाशिक जिल्ह्यात शनिवारी रात्रीच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Nashik Earthquake : नाशिक जिल्ह्यात शनिवारी रात्रीच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 8 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजून 10 मिनिटांच्या दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
माहितीनुसार, नाशिक शहरातील सातपूर, इंदिरानगर, मेन रोड, पंचवटी, हिरावाडी आणि पाथर्डी पाडासह शहरातील इतर काही भांगामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. तर ग्रामीण भागातील कसारा घाट, रामशेत किल्ला परिसरात देखील भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती समोर येत आहे.
तर दुसरीकडे शहरात भूकंपाच्या धक्क्यामुळे काही घरांमध्ये भांडी आणि वस्तू पडल्याचा घटना घडल्याची देखील माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या ग्रामीण भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असल्याची माहिती देखील मिळाली आहे.
लक्ष्मी योग ‘या’ राशींसाठी ठरणार फायदेशीर; होणार आर्थिक लाभ
तर या भूकंपाची तीव्रता तुलनेत कमी असल्याने नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन करत नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.