मालेगाव सुपारी प्रकरणात मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंचा दणका; FDA च्या 5 अधिकाऱ्यांवर निलंबन
Malegaon Supari Scam : राज्यातील राजकारणात सध्या चर्चेत असणाऱ्या मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरणात अन्न व औषधे प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ
Malegaon Supari Scam : राज्यातील राजकारणात सध्या चर्चेत असणाऱ्या मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरणात अन्न व औषधे प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोठी कारवाई करत अन्न व औषधे प्रशासन विभागाच्या पाच अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. 252 मेट्रिक टन असुरक्षित सुपारी कागदोपत्रीच नष्ट केल्याचा आरोप या अधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे. एकाच दिवशी 11 ट्रक सुपारी नष्ट करणे अशक्य असल्याचा खुलासा चौकशी समितीकडून करण्यात आल्यानंतर या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात प्रदूषण मंडळाची परवानगी देखील घेण्यात आली नव्हती असा खुलासा देखील चौकशी समितीने केला आहे.
252 मेट्रिक टन सुपारी नष्ट करणे अशक्य
या प्रकरणाचा तपास करत असताना एकाच दिवसात 11 ट्रकमधून 252 मेट्रिक टन सुपारी (Malegaon Supari Scam) नष्ट करणे अशक्य असल्याचा खुलासा चौकशी समितीकडून करण्यात आला आहे. चौकशी समितीने या प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. 11 ट्रकची सरासरी क्षमता 44 मेट्रिक टन होते तरीही अधिकाऱ्यांनी एकाच दिवसात 252 मेट्रिक टन सुपारी कशी नष्ट केली? वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या पंचनाम्यांमध्ये नमूद केलेली वाहने आणि पंचसाक्षीदार एकच कशी? एकाच वेळी ती दोन वेगवेगळ्या ठिकाणी कशी काय उपस्थित राहू शकतात? असे प्रश्न चौकशी समितीकडून या कारवाईवर उपस्थित करण्यात आले.
तसेच या प्रकरणात सुपारी नष्ट करण्यासाठी (Supari Scam) प्रदूषण नियंत्रण मंडळाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती असा खुलासा देखील चौकशी समितीकडून करण्यात आल्याने या प्रकरणात मंत्री नरहरी झिरवळ आणि तुकाराम मुंढे यांनी अ. र. दाभाडे (अन्न सुरक्षा अधिकारी, गुप्तवार्ता, नाशिक) , अ. उ. रासकर (अन्न सुरक्षा अधिकारी, नाशिक) , गो. वि. कासार (अन्न सुरक्षा अधिकारी, नाशिक) , यो. रो. देशमुख (अन्न सुरक्षा अधिकारी, नाशिक) आणि श्रीम. सु. दे. महाजन (अन्न सुरक्षा अधिकारी, नाशिक) या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
सचिन सानप यांना शिवसेनेचा जाहिर पाठिंबा; एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
नेमकं प्रकरण काय?
11 फेब्रुवारी 2024 रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे एफडीएने कारवाई करत अंदाजे 10 कोटी रुपये बाजर मूल्य असलेल्या 11 ट्रक सुपारीचा साठा जप्त केला होता. तपासाता ही सुपारी खाण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे न्यायालयाने ही सुपारी नष्ट करण्याचे आदेश 5 मार्च रोजी दिले होते. या प्रकरणात सचिन खैरनार यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर अन्न व औषधे प्रशासनाचे आयुक्त तुकारम मुंढेंनी चौकशी समितीची स्थापना केली होती.