शेवगाव भाजपात खळबळ… माजी जिल्हाध्यक्ष मुंडेंच्या पत्नीचा नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून अर्ज

BJP Shevgaon मोठी खळबळ उडाली आहे कारण भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांच्या पत्नीने शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरला आहे.

BJP Shevgaon

Former BJP district president Arun Mundhe’s wife applies for the post of mayor from Shiv Sena in Shevgaon : राज्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांमधील आउटगोइंग आणि इन्कमिंग म्हणजेच पक्ष बदलांचे वारे जोराने वाहत आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी विरोधी पक्षासोबत देखील युती आणि आघाडी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव नगरपंचायतमध्ये मात्र भाजपला धक्का बसला आहे. कारण या ठिकाणी भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांच्या पत्नीने नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून अर्ज भरला आहे.

संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचा 729 व्या संजीवन समाधी सोहळा व जागतिक सहिष्णुता सप्ताहाचा रौप्य महोत्सव साजरा

शेवगाव नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी माया अरुण मुंडे यांनी शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर स्थानिक भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. भाजपाचे प्रदेश सरचिटणीस व अहिल्यानगरचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्या पत्नी असल्याने या उमेदवारीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून अरुण मुंडे हे भाजपात सक्रिय असून पंकजा मुंडे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सभापती राम शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात. अशा परिस्थितीत त्यांच्या पत्नीची शिंदे गटाकडून उमेदवारी ही भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण करणारी ठरली आहे.

यापूर्वीही पक्षातील अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कामकाजावर बोट ठेवत नाराजी व्यक्त करत भाजपाला रामराम केला होता. पंकजा मुंडे यांचे समर्थक गोकुळ दौंड, तसेच गोपीनाथराव मुंडे यांचे कट्टर समर्थक बंडू रासने व तुषार वैद्य यांसारख्या कार्यकर्त्यांनीही पक्षापासून मनोमळाव केल्याच्या घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर माया मुंडे यांच्या शिंदे गटाकडून दाखल झालेल्या उमेदवारीमुळे शेवगावपाथर्डी मतदारसंघातील मूळ भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, नाराजी आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घडामोडींमुळे शेवगावच्या राजकारणाला अचानक वेग आला असून भाजपच्या स्थानिक संघटनांमध्ये मोठी खळबळ दिसून येत आहे. 

follow us